Tamhini Ghat Accident : मिल्कीबार वॉटरफॉलच्या दरीत तरुण कोसळला

चाकण येथील २० वर्षीय युवकाचा मृत्यू; ताम्हिणी घाटातील घटना
Tamhini Ghat Accident
Tamhini Ghat Accidentpudhari photo
Published on: 
Updated on: 

माणगाव : अरुण पवार

निसर्गाचे सौंदर्य डोळ्यांत साठव-ण्यासाठी पर्यटनाला आलेल्या तरुणांवर काळाने घाला घातला. मंगळवारी ताम्हिणी घाटातील प्रसिद्ध मिल्की बार वॉटरफॉल येथे ४५० फूट खोल दरीत कोसळून एका २० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. शाहिद अन्सारी (वय २०, रा. चाकण, नाणेकरवाडी) असे मृत युवकाचे नाव आहे. या दुर्घटनेमुळे पर्यटनस्थळी एकच खळबळ उडाली आहे.

गिर्यारोहणाचा कोणताही अनुभव किंवा आवश्यक प्रशिक्षण नव्हते. अशा परिस्थितीत धोकादायक ठिकाणी चढाई करण्याचा प्रयत्न जीवावर बेतला. याचवेळी शाहिद अन्सारी याचा तोल जाऊन तो सुमारे ४५० फूट खोल दरीत कोसळला.

Tamhini Ghat Accident
Raigad Tourism : श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याला प्रतिष्ठित ‘ब्लू फ्लॅग’ पुरस्कार

घटनेची माहिती मिळताच पौड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. युवकाचा शोध घेण्यासाठी एस-व्हीआरएसएस रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. खोल दरी, दुर्गम परिसर आणि आव्हानात्मक परिस्थिती अशा अडचणींचा सामना करत बचाव पथकाने शोधमोहीम सुरू केली. सुमारे दीड तासांच्या अथक प्रयत्नांनंतर शाहिदचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश आले. या घटनेचा पुढील तपास पौड पोलीस करीत आहेत.

Tamhini Ghat Accident
Mumbai Diwali Waste Collection : दिवाळीत मुंबईत कचऱ्याचे डोंगर

निसर्गाचा आनंद घ्या; पण जीव धोक्यात घालू नका !

ताम्हिणी घाटातील धबधबे, दऱ्या आणि निसर्गरम्य परिसर पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. मात्र, याच सौंदर्याच्या मोहात पडून सुरक्षिततेचे नियम दुर्लक्षित करणे किती महागात पडू शकते, याची जाणीव या दुर्घटनेने पुन्हा एकदा करून दिली आहे. सेल्फी, फोटो, साहसी चढाई किंवा थराराच्या नादात धोकादायक कड्यांवर जाणे टाळावे. विशेषतः गिर्यारोहणाचे प्रशिक्षण आणि आवश्यक सुरक्षा साधने नसताना अशा ठिकाणी जाणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. पर्यटकांनी सुरक्षित ठिकाणीच पर्यटनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.