Raigad Tourism : श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याला प्रतिष्ठित ‘ब्लू फ्लॅग’ पुरस्कार

रायगड जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला मिळणार मोठी चालना
Shrivardhan Beach Blue Flag Award
Shrivardhan Beach Blue Flag Awardpudhari photo
Published on: 
Updated on: 

श्रीवर्धन : अनिकेत मोहित

रायगड जिल्ह्यातील निसर्गरम्य श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठित ‘ब्लू फ्लॅग’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. या ऐतिहासिक यशामुळे श्रीवर्धनसह संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, कोकणातील पर्यटन विकासाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाली आहे.

महिला व बालविकास मंत्री तथा स्थानिक आमदार आदिती तटकरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून हा आंतरराष्ट्रीय बहुमान मिळाल्याची भावना स्थानिक पातळीवर व्यक्त होत आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून श्रीवर्धनच्या निसर्गसौंदर्याला आणि पर्यटन क्षमतेला जागतिक नकाशावर ठळक स्थान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Shrivardhan Beach Blue Flag Award
Baby Kidnapping Case : अवघ्या दहा तासात अपहृत चिमुकलीचा शोध

स्थानिक रोजगार आणि पर्यटन उद्योगाला नवी उभारी

या मानांकनामुळे श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन क्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार असून, देश-विदेशातील पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणावर वाढण्याची अपेक्षा आहे. याचा थेट फायदा स्थानिक हॉटेल व्यावसायिक, पर्यटन संबंधित प्रतिष्ठाने आणि व्यावसायिकांना होणार आहे.

तसेच, स्थानिक तरुणांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊन श्रीवर्धनचा ऐतिहासिक वारसा आणि कोकणी संस्कृती सातासमुद्रापार पोहोचण्यास मदत होणार आहे. संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण असलेल्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून आनंद व्यक्त केला जात आहे.

Shrivardhan Beach Blue Flag Award
Raigad Crime : खोपोली हादरली! ७० वर्षीय महिलेची हत्या

आंतरराष्ट्रीय पावती

‘ब्लू फ्लॅग’ हा जगभरात मान्यता प्राप्त असलेला पर्यावरणपूरक समुद्रकिनाऱ्यांसाठीचा प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय दर्जा आहे. समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता, समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता, पर्यावरण संवर्धन, पर्यटकांची सुरक्षितता, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, आपत्कालीन व्यवस्थापन, पर्यावरणविषयक जनजागृती आणि शाश्वत व्यवस्थापन अशा विविध निकषांच्या आधारे हा पुरस्कार प्रदान केला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.