Muddy Water Supply: तळा शहराची पाणी समस्या कायम नळातून गढूळ पाणीपुरवठा

अंबेळी व तहसिल शेजारील धरण या दोन ठिकाणी असलेल्या नगरपंचायतीच्या बोरिंगच्या माध्यमातून तळा शहराला पाणी पुरवठा केला जातो.
Muddy Water Supply
Muddy Water SupplyPudhari
Published on
Updated on

तळा: तळा शहरातील अनेक ठिकाणी नागरिकांच्या नळाला गढूळ पाणी येत असल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात काही भागात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून भर उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागत आहे.

तर काही ज्यांची परिस्थिती चांगली आहे ते पाणी खाजगी पाणी विक्रेत्यांकडून विकत घेत आहेत.अंबेळी व तहसिल शेजारील धरण या दोन ठिकाणी असलेल्या नगरपंचायतीच्या बोरिंगच्या माध्यमातून तळा शहराला पाणी पुरवठा केला जातो.

Muddy Water Supply
ONGC Chemical Leak: उरणमध्ये ओएनजीसी नाल्यातून रसायन मिश्रीत पाणी; नागरिकांना श्वसनाचा त्रास, परिसरात घबराट!

गेल्या अनेक वर्षांपासून एप्रिल, मे व जून महिन्यात येत असलेली पाण्याची टंचाई याही वर्षी अधिक प्रमाणात आहे. काही ठिकाणी दोन दिवसा आड ,तीन दिवसा आड , चार दिवस आड पाणी येत असून मागील दोन, तीन दिवसांपासून गढूळ पाणी नळाला येत असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.

Muddy Water Supply
Car Accident: कनेक्टिंग लिंकवरील व्हॅली ब्रिजवर तीन कारचा अपघात

काही भागात महिलांना पाण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागत आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून तळा शहरात गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचे शहरातील नागरिकांनी सांगितले. हे पाणी वापरण्यायोग्य नसल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका आहे .गढूळ पाण्याची समस्या त्वरित मार्गी लावण्याची मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news