Accident News: पोलादपूरनजीक भरधाव लालपरीची टेम्पोला धडक

मुंबई-गोवा महामार्गावर विचित्र अपघात; प्रवासी किरकोळ जखमी
Accident
AccidentPudhari file photo
Published on
Updated on

पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गासह इतर मार्गांवर एसटी बस अपघाताचे सातत्य कायम राहिले आहे. शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास पोलादपूर बस स्थानकामधून बोरीवलीकडे जाणाऱ्या एसटीची महामार्गावरील हॉटेल राजमुद्रा जवळ पुढे जाणाऱ्या चिपळूण बदलापूर बसला ठोकर बसली असता बसमधील काही प्रवासी यांच्या नाका तोंडाला किरकोळ मार लागल्याची घटना घडली आहे.

या अपघाताची कोणतेही तक्रार दाखल नसल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पोलादपूर बस स्थानकातूक पोलादपूर बोरिवली ही बस महामार्ग वरुन महाड दिशेला येत असताना हॉटेल राजमुद्रा जवळ आली असता त्या बसच्या पुढे असणाऱ्या चिपळूण-बदलापूर बसला ब्रेक न लागल्याने वाहक बाजूकडील बाजूची ठोकर बसली असता चिपळूण बदलापूरही बस पुढे असणाऱ्या मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोला मागून आढळून अपघात झाला.

Accident
Panvel Theft: रेल्वे पोलिसांनी सराईत चोराच्या आवळल्या मुसक्या; पनवेलमध्ये २६ लाख ३१ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त

महामार्गावर अचानक मोकाट गुरे आल्याने त्यांना वाचविण्यासाठी माल वाहतूक करणाऱ्या टेम्पोने आपले वाहन हळू केले. त्या पाठोपाठ येणाऱ्या बसने सुद्धा वेग नियंत्रित केला मात्र त्या मागून येणाऱ्या पोलादपूर-बोरिवली वरील चालकाला वेगावर नियंत्रण ठेवता न आल्याने सदरचा अपघातात घडल्याचे प्रवासी यांनी सांगितले.

Accident
Dhamani Dam Water Level: वसई-विरारकरांची पाणी चिंता मिटली; धामणी धरणाचा जलसाठा ९७ टक्क्यांवर, नागरिकांमधून समाधान

या अपघात जखमी वसुधा वीर दीक्षित, वय ५० यांच्यावर उपचार करण्यात येत त्यांना पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले. अपघातानंतर दोन्ही बसेस महामार्ग च्या बाजूला उभे असल्याचे चित्र दुपार पर्यत पहावयास मिळते. या अपघाताची तक्रार नसल्याने प्रवासी सुद्धा इतर वाहनाने मार्गस्त झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news