Raigad Rain: मुसळधार पावसाने सायन-पनवेल महामार्ग जलमय; नेरुळ, उरण फाटा परिसरात पाण्याचे तळे, वाहतूक ठप्प

सततच्या मुसळधार पावसामुळे सायन-पनवेल महामार्गावरील नेरुळ आणि उरण फाटा परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. रस्त्यावर पाणी भरल्याने वाहतूक मंदावली असून प्रवाशांना तासनतास खोळंबून राहावे लागले.
Raigad Rain
Raigad RainPudhari
Published on
Updated on

खांदा कॉलनी: रात्रीपासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे सायन-पनवेल महामार्गाची मोठी दैना झाली आहे. महामार्गावरील उरण फाटा आणि नेरुळ परिसरातील सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने हा संपूर्ण परिसर जलमय झाला आहे.

रस्त्यावर पाणी भरल्यामुळे वाहनचालकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत असून, या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतुकीचा वेग कमालीचा मंदावला आहे.

Raigad Rain
Pen Vegetable Market: पेण मार्केटमध्ये भाजी खरेदीसाठी गर्दी; अनेक भाज्यांचे दर वाढले

पावसाचा जोर कायम असल्याने अनेक ठिकाणी रस्त्याला तलावाचे स्वरूप आले आहे. या साचलेल्या पाण्यातून वाहने अत्यंत सावधगिरीने मार्गक्रमण करताना दिसून येत आहेत. अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे सकाळी घराबाहेर पडलेल्या नोकरदारांना, विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना तासनतास खोळंबून राहावे लागले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news