Baby Kidnapping Case : अवघ्या दहा तासात अपहृत चिमुकलीचा शोध

कचरावेचक महिला ताब्यात; ठाणे पोलिसांनी केली बाळाची सुटका
kidnapping
kidnappingPudhari
Published on: 
Updated on: 

ठाणे : आईच्या कुशीत झोपी गेलेल्या चार महिन्यांच्या चिमुकलीचे अपहरण करणाऱ्या ५२ वर्षीय कचरा वेचणाऱ्या महिलेस ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान तिच्या ताब्यातून चिमुकलीची सुखरूप सुटका चितळसर पोलिसांनी केली आहे. या चिमुकलीस पोलिसांनी तिला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात सुखरूप परत दिले आहे.

दिवाळीत राजस्थानमधून ठाण्यात झाडू विक्रीसाठी आलेले छोगालाल मांगीलाल वागरिया (२७) हे त्यांच्या पत्नी व चार महिन्याच्या मुलीसह माजीवाडा ब्रिज खाली राहतात. ७ नोव्हेंबर रोजी ते माजीवाडा ब्रिजखाली झोपी गेलेले असताना पहाटे ५ ते ७ वाजेच्या सुमारास त्यांची मुलगी आपल्या आईच्या कुशीत झोपलेली असताना तिचे कुणीतरी अपहरण करून पळून नेले होते. या प्रकरणी चितळसर पोलिसात वागरिया दाम्पत्याने तक्रार दाखल केली होती.

kidnapping
Bhiwandi Drowning Incident : भिवंडीतील भादवड तलावात दोन अल्पवयीन मुले बुडाली

बाळाचे अपहरण होण्याची ही गंभीर घटना असल्याने पोलिसांनी या घटनेची तत्काळ दखल घेत चिमुकलीच्या शोधासाठी पाच पथके नियुक्त केली होती. पोलीस पथकांनी घटनास्थळी व परिसरात असलेले सीसीटीव्ही पडताळून बघितले असता त्यात एक महिला चिमुकलीस झोपेत असताना उचलून नेत असल्याचे दिसून आली. त्यानंतर पोलीस पथकांनी या महिलाचा शोध सुरू केला असता ही महिला कळवा येथे आढळली.

कमल मोरे (५२, कळवा) या महिलेस पोलिसांनी ताब्यात घेऊन तिच्या तावडीतून अपहरण झालेल्या चिमुकलीची सुखरूप सुटका केली व तिला परत आपल्या आई-बाबांच्या ताब्यात दिले.

kidnapping
Bharat Gogawale : ७० हजार झाडे तोडली तर ७५ हजार झाडे लावण्याची आमची तयारी

बाळ आई-वडिलांकडे सुखरूप सुपूर्द

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महिलेची चौकशी केली असता ७ नोव्हेंबर रोजी पहाटे सदर महिला सफाईचे काम करण्यास माजीवाडा ब्रिज येथे गेली होती. तेथे चिमुकली आपल्या आई बाबांच्या कुशीत झोपलेली असताना तिला उचलून आपल्या सोबत नेले होते, अशी माहिती समोर आली. चितळसर पोलिसांनी अपहरण झालेल्या चिमुकलीचा अवघ्या दहा तासांच्या आत शोध घेऊन तिला परत आपल्या आई-वडिलांकडे सुखरूप सुपूर्द केल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.