

महाड : श्रीकृष्ण द बाळ
महाडचा सुपुत्र आयपीसीएल मधून राष्ट्रीय स्तरावर विविध स्पर्धांमधून सर्वोत्कृष्ट कामगिरी शेकडो पुरस्कार प्राप्त केलेल्या श्रेयस रवींद्र वैद्य याची महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सन 22-23 वर्षाकरिता शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घोषित केला आहे. ऐतिहासिक व सामाजिक क्रांतीचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाड नगरीच्या वैभवांमध्ये हा मानाचा तुरा असल्याची प्रतिक्रिया महाडकर नागरिक व्यक्त करीत आहेत. या संदर्भात श्रेयस वैद्य च्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत सन 22 23 च्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारा संदर्भातील पत्र प्राप्त झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
राज्य शासनामार्फत क्रीडा क्षेत्रामध्ये अतुलनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडू मार्गदर्शक यांना क्रीडा क्षेत्रातील कार्यकर्तृत्वामुळे महाराष्ट्राच्या क्रीडा जीवनावर झालेला स्मरणीय प्रभाव लक्षात घेऊन या संबंधितांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सन 22-23 च्या या संदर्भातील खेळाडूंच्या निवडीसाठी 2 फेब्रुवारी 24 रोजी शासनाने स्थापित केलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर 3 ऑक्टोबर रोजी या संदर्भातील विधिवत घोषणा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
श्रेयसचा जन्म महाड येथे झाला असला तरीही त्याचे वडील रिलायन्स कंपनीमध्ये आहेत. यामुळे त्याचे शालेय शिक्षण रिलायन्स टाऊनशिप नागोठणे येथे झाले. आंतरराष्ट्रीय पातळीवर श्रेयस याने सन 2011 मध्ये इंडोनेशिया येथे झालेल्या आशियाई स्पर्धेमध्ये वॉटर पोलो संघाचा कप्तान म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. सिंगापूर येथे झालेल्या सन 19 व थायलंड 22 येथील स्पर्धेतही श्रेयस सहभागी झाला होता. महाराष्ट्राच्या वतीने खेळताना केरळ येथे 2015 वर्षी संपन्न झालेल्या 35 व्या सन 2022 मध्ये 36 राजकोट येथे झालेल्या तसेच गोवा 23 मध्ये 37 व्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व करताना अनुक्रमे 15 व 22 रोजी रोजी ब्रांच तर 23 वर्षी सुवर्णपदक प्राप्त केले. वॉटर पोलो स्पर्धेतील श्रेयसच्या चमकदार कामगिरीमुळे त्याची नियुक्ती करण्यात आली असून सन 2021,22,23, व 24 या वर्षात राष्ट्रीय पातळीवर झालेल्या स्पर्धांमधून चमकदार कामगिरी केली आहे.
श्रेयस वैद्यने वयाच्या सहाव्या वर्षी धरमतर खाडी पोहून जाण्याचा विक्रम केला होता. लहानपणापासूनच जलतरण विषयांमध्ये त्याला असलेली विशेष रुची लक्षात घेऊन त्याच्या कुटुंबाने मधील क्रीडा शिक्षकांकडून त्याच्याकडे अधिक लक्ष देऊन या क्षेत्रात दिलेल्या संधीचे शासनाकडून प्राप्त झालेल्या या पुरस्काराने सोने केल्याची प्रतिक्रिया वैद्य कुटुंबीयांकडून व्यक्त करण्यात येत आहे.