Kharpada Shivai Devi Temple : नवसाला पावणारी खारपाडा येथील शिवाईदेवीचे जागृत देवस्थान

निसर्गाच्या सान्निध्यातील देवस्थान; देवीच्या दर्शनासाठी भाविकांची दररोज गर्दी
Kharpada Shivai Devi Temple
नवसाला पावणारी खारपाडा येथील शिवाईदेवीचे जागृत देवस्थान pudhari photo
Published on
Updated on

रायगड : मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा गावाकडील एका टेकडीवर निसर्गाच्या सान्निध्यात मोठमोठ्या वृक्षांच्या कुशीत वसलेली खारपाड्याचे स्वयंभू जागृत देवस्थान म्हणून शिवाई देवीची महती सर्वत्र पसरू लागल्याने दूरदूरचे भावीक मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी येत आहेत.

देवीचा महिमा अफाट असून भक्तांच्या हाकेला धावून जाणारे आणि नवसाला पावणारी अशी देवीची महती आहे. गेल्या शंभर वर्षापासून देवीचा महिमा गायला जात आहे. यावर्षी देवीचे नव्याने ट्रस्टी उभे करण्यात आले असून प्रथमच देवीचा नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे.

स्वातंत्रपूर्व काळात मुंबई-गोवा महामार्गाच्या कामानिमित्त कै. बुधाची झांजा भगत हे काम करत होते. त्यावेळी मुंबई-गोवा हायवेवर काम करण्यासाठी खारपाडा येथील छोटी खिंड फोडण्याचे काम चालू होते. त्यावेळी गाड्यांची व्यवस्था नसल्याने सातार्‍याहून जाधव कुटुंब आपली गाढव घेऊन माती वाहून देण्याचे काम करत असत. यावेळी शिवाई देवीचा पहिला साक्षात्कार जाधव यांना झाला असे सांगितले जाते. त्यांनी देवीची हकीगत भगत यांच्या कानावर घातली. तेव्हापासून या देवीची पूजा होते आहे.

Kharpada Shivai Devi Temple
Raigad heavy rainfall : अतिवृष्टीमुळे पोलादपूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल

आपल्याला देवीचा साक्षात्कार झाल्यानंतर सातार्‍यावरून जाधव कुटुंब या ठिकाणी देवीला भेटण्यासाठी नेहमीच येत असत. 2014 च्या ऑक्टोबरमध्ये देवीची दहा दिवस नवरात्र उत्सव पूजा पाठ केले.

त्यानंतर भगत कुटुंबीयांनी या ठिकाणी दगडात स्वयंभू प्रकटलेल्या शिवाय देवी व वाघाची छबी असलेल्या ठिकाणी चौथरा बांधून नियमित पूजा पाठ सुरू केले. वस्तुस्थिती पाहता मोठ्या प्रमाणात आमराई असलेल्या या ठिकाणी दोन आंब्यांच्या झाडांमध्ये देवीचे रूप असलेले दोन देवी व गणपती, वाघासह प्रतिमा असलेली पहायला मिळाली. त्यानंतर लोक वर्गणीतून व अंग मेहनतीतून चौथरा बांधला, त्यानंतर रोज पूजा आरती होऊ लागली.

Kharpada Shivai Devi Temple
Pali Marimata Devi Temple : पाली ग्रामस्थांच्या हाकेला धावणारी श्री मरीमाता देवी आई

या अनुषंगाने लोकांची ओढ व भावना धार्मिकतेकडे वळून भाविक निष्ठेने व श्रद्धेने या जागृत शिवाई देवीकडे लक्ष देऊन सेवा करू लागले. अनेकांना त्यांची प्रचिती आली त्यामुळे सुखदुःखाचे गार्‍हाणे मांडून नवस बोलले जातात व ते यशस्वी झाल्याचे अनुभव भाविक सांगत असतात. यामुळे गेली अनेक वर्षांपासून या देवस्थानवर भाविकांची सातत्याने गर्दी होत असते.

भजन, कीर्तनासह विविध कार्यक्रम

ग्रामस्थांच्या सहकार्याने यावेळी नवरात्र उत्सव साजरा होत आहे. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांचे नाच भजन व्याख्यान कीर्तन पारंपरिक नाच व अन्य कार्यक्रम नियमित होत आहेत, अशी पेण तालुक्यातील खारपाडा गावातील देवीचा महिमा अफाट असून भक्तांच्या हाकेला धावून जाणारे आणि नवसाला पावणारी अशी देवीची महती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news