

पोलादपूर ः आगामी जिल्हा परिषदेच्या 2 व पंचायत समितीच्या 4 जागा शिवसेना च्या निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त रोहयो मंत्री भरतशेठ गोगावले यांनी व्यक्त केला.
तालुक्यातील चांभारगणी खुर्द गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्त्यांनी नामदार मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत संख्येने शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
या वेळी बोलताना ना गोगावले यांनी विकास कामाची पूर्तता शिवसेना शिंदे गट मार्फत होत असल्याचे सांगत विरोधात टीका करणाऱ्यांची हवा गोगावले यांनी काढली आहे. चांभारगणी खुर्द ग्रामपंचायतीचे सदस्य सहदेव शंकर एरापले, तसेच ग्रामस्थ भिवा सकपाळ, विठोबा एरापले, पांडुरंग एरापले, नारायण सकपाळ यांच्यासह ग्रामस्थांनी कापडे येथे झालेल्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला व पुरुष नागरिकांनी शिवसेनेचा ध्वज हाती घेतला.
या निमित्त आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, तालुकाप्रमुख निलेश आहिरे, तसेच शिवसेनेचे पदाधिकारी लक्ष्मण मोरे, अनिल दळवी, तानाजी निकम, शांताराम गोळे, शैलेश सलागरे, शशी पार्टे, छोटू दीक्षित, नागेश पवार, लक्ष्मण बुवा आदी मान्यवर उपस्थित होते.
महाड विधानसभा मतदारसंघात गोगावले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकासकामांच्या जोरावर राष्ट्रवादी पक्षातून होत असलेली गळती सुरूच असून, अनेक नेते व कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. यामुळे राष्ट्रवादी पक्षाला मतदारसंघात मरगळ आल्याचे चित्र दिसत असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे.