Alibag municipal election : शेकाप, काँग्रेस आघाडीचे शक्तिप्रदर्शन

अलिबागमध्ये अक्षया नाईक यांचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल, दिग्गज रिंगणात
Alibag municipal election
शेकाप, काँग्रेस आघाडीचे शक्तिप्रदर्शनpudhari photo
Published on
Updated on

अलिबाग ः अलिबाग नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत शेकाप व काँग्रेस आघाडीने शनिवारी (दि.15) निवडणूक अर्ज दाखल करत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ढोल-ताशांचा गजर, शेकापच्या लालबावट्यांची रेलचेल आणि कार्यकर्त्यांच्या घोषणांनी संपूर्ण शहरात निवडणूक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून शेकापच्या अक्षया नाईक यांनी अर्ज दाखल केला. सकाळी 10 वाजताच शहरातील शेतकरी भवन परिसरात असंख्य शेकाप तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते जमत होते. शेतकरी भवनात उमेदवारांचे आगमन होताच घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

Alibag municipal election
Raigad municipal election : रायगडात नगराध्यक्षपदासाठी 13, नगरसेवकांसाठी 140 उमेदवारांचे अर्ज

सकाळी 10 ते 11 दरम्यान शेकाप-काँग्रेस आघाडीचे सर्व उमेदवार शेतकरी भवनात दाखल झाले. त्यावेळी शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी मोठ्या उत्साहात उपस्थित राहिले. जयंत पाटील यांनी सर्व उमेदवारांना भेट देत निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्षाच्या एकजुटीचा संदेश दिला.

मिरवणुकीसह उमेदवारी अर्ज दाखल

अंदाजे 11.30 वाजता शेतकरी भवन येथून सर्व उमेदवारांची मिरवणूक अलिबाग नगरपरिषदेकडे मार्गस्थ झाली. ढोल-ताशांचा निनाद, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि आघाडीच्या शक्तीचे प्रदर्शन या सर्वांच्या मेळाव्यात उमेदवारांचा आत्मविश्वास स्पष्ट जाणवत होता. नगरपरिषदेच्या कार्यालयात सर्वप्रथम नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अक्षया नाईक यांनी निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम पाटील यांच्याकडे आपला अर्ज दाखल केला. त्यानंतर आघाडीतील सर्व प्रभागांचे उमेदवार क्रमवार अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहिले.

या अर्ज दाखल प्रक्रियेत अनेक अनुभवी व माजी पदाधिकारीही सहभागी झाले होते.यामध्ये माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माजी उपनगराध्यक्ष ॲड. मानसी म्हात्रे, ॲड. नीलम हजारे यांच्यासह , सुषमा पाटील तर तीन वेळा निवडून आलेल्या शैला भगत यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केले. काँग्रेसकडून समीर ठाकूर आणि अभय म्हमुणकर यांनी आपले अर्ज आघाडीच्या वतीने दाखल केले.

Alibag municipal election
Palghar municipal election : पालघर न.प. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांबाबत रहस्य कायम

शेकाप,काँग्रेस आघाडीचे उमेदवार

नगराध्यक्ष -सर्वसाधारण महिला ः अक्षया नाईक. प्रभाग 1 अ ः संतोष गुरव, ब ः संध्या पालवणकर, प्रभाग 2 अ ः सुक्षमा पाटील, ब ः प्रशांत नाईक, प्रभाग 3 अ ः साक्षी पाटील, बः आनंद अशोक पाटील, प्रभाग 4 अ ः रेश्माथळे, बः महेश शिंदे, प्रभाग 5 अ ः निवेदिता वाघमारे, ब ः समीर ठाकूर, प्रभाग 6 अ ः ऋषिकेश माळी, ब ः अश्विनी ठोसर, प्रभाग 7 अ ः मानसी म्हात्रे, ब ःअभय म्हामूणकर, प्रभाग 8 अ ः निलम हजारे, ब ः अनिल चोपडा, प्रभाग 9 अ ः योजना पाटील, ब ः सागर भगत, प्रभाग 10 अ ः शैला भगत, ब ः वृषाली भगत.यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

निवडणूक वातावरण तापले

आघाडीच्या या शक्तिप्रदर्शनामुळे अलिबाग शहरात निवडणुकीची तयारी शिगेला पोहोचली आहे. मोठ्या ताकदीने अर्ज दाखल केल्याने शेकाप-काँग्रेस आघाडी विजयाबाबत आत्मविश्वास दाखवत आहे. आगामी दिवसांमध्ये प्रचार मोहीम अधिक रंगतदार होणार असून अलिबाग नगरपरिषदेची निवडणूक चुरशीची होण्याचे संकेत स्पष्ट दिसत आहेत. यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सुप्रिया पाटील, काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र ठाकूर, रविना ठाकूर, माजी गटनेते प्रदीप नाईक आदी उपस्थित होते.

15 नवीन चेहऱ्यांना संधी

शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी मागील आठवडयात आघाडीची घोषणा करताना नवीन उमेदवार देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार यावेळी नगरसेवक पदाच्या 20 पैकी 15 जागांवर नवखे उमेदवार आघाडीने उभे केले आहेत. तर पाच जुनेच चेहरे आहेत. जुन्या नव्याचा मेळ साधण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला आहे. याचा फायदा शेकापला होईल,असा दावा केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news