Shahapur Leopard Poaching: शहापूरमध्ये बिबट्याची क्रूर हत्या; पंजे छाटून शिकाऱ्यांचा अमानुष कृत्य उघड

वाशाळा वनपरिक्षेत्रातील सुसरवाडी हद्दीत मृतावस्थेत आढळला बिबट्या; वनविभागाच्या गस्त व्यवस्थेवर गंभीर प्रश्न
leopard poaching
leopard poachingPudhari
Published on
Updated on

शहापूर : राजेश जागरे

तालुक्यातील वाशाळा वनपरिक्षेत्रात अज्ञात शिकाऱ्यांनी बिबट्याची क्रूरपणे हत्या करून त्याच्या पायांचे पंजे छाटत अमानुषतेचा कळस गाठल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सुसरवाडी गाव हद्दीतील कोरड्याठाक नाल्यात मंगळवारी बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला असून, या प्रकारामुळे वन्यजीवांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

leopard poaching
Khopoli Cow Rescue: खोपोलीत गाभण गायीचा ड्रेनेज टँकमध्ये पडून अपघात; दोन तासांच्या प्रयत्नांनंतर सुखरूप बचाव

घटनेची माहिती मिळताच वनअधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पाहणीदरम्यान बिबट्याचे पायांचे पंजे धारदार हत्याराने कापल्याचे स्पष्ट झाले. नख्या व मिशांच्या केसांबाबत असलेल्या अंधश्रद्धांमुळे शिकाऱ्यांकडून बिबट्यांची शिकार होत असल्याची चर्चा असतानाच, गस्त पथके नेमकी कुठे होती? शिकाऱ्यांचे मनोबल इतके वाढले कसे? असे तीव्र सवाल नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

leopard poaching
Panvel Karjat Suburban Railway: पनवेल–कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर 85% पूर्ण; एमएमआरमधील प्रवाशांना लवकरच मोठा दिलासा

वन्यजीव संरक्षणाची जबाबदारी असलेल्या यंत्रणेच्याच हद्दीत असा प्रकार घडल्याने वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news