

जेएनपीए ( रायगड ) : विठ्ठल ममताबादे
उरण, पेण व पनवेल तालुक्यातील सेझग्रस्त शेतकऱ्यांनी एस.ई.झेड. कंपनीने अन्याय पद्धतीने घेतलेल्या जमिन मिळकती परत मिळवून देण्याकरीता उरण विधानसभा मतदार संघांचे आमदार महेश बालदी यांची भेट घेतली.
कंपनीने खरेदी केलेली जमिन मिळकत १५ वर्षात न वापरल्यामुळे मार्च २०२२ पासून ५२३ शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे जमिन मिळकती परत करण्याकरीता उरण, पेण, पनवेल तालुक्यातील शेतकऱ्यांतर्फे ॲड. दत्तात्रेय नवाळे यांनी चौकशी अर्ज दाखल केले. त्यावर अंतिम सुनावणी होऊन आत्ता प्रकरण अंतिम आदेशाकरीता ठेवण्यात आले आहे. या विषयी पेण तालुक्याचे आमदार रवींद्र पाटील यांनी सेझग्रस्त शेतकऱ्यांची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे बरोबर २ एप्रिल २०२५ रोजी मंत्रालयात भेट घडवून आणली होती. त्यावेळी बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी रायगड यांना एस.ई.झेड. करीता संपादीत केलेल्या जमिन मिळकती विषयी संपूर्ण अहवाल मागविल होता. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी रायगड यांनी १ जून २०२५ रोज अपर मुख्य सचिव (महसूल) यांन एस.ई.झेड. करीता संपादीत केलेल्य जमिन मिळकती विषयी संपूर्ण अहवाल सादर केला.
महसूल मंत्री बावनकुळे यांनी सदरचे प्रकरण मंत्रिमंडळाच्या बैठकी समोर ठेवुन त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन सदरच्या सभेमधे दिले होते. त्या अनुषंगाने सदर प्रश्न लवकर मार्गी लागावा यासाठी सेझग्रस्त शेतकऱ्यांनी उरण तालुक्याचे आमदार महेश बालदी यांची भेट घेऊन सदरचे प्रकरण महसुल मंत्री बावकुळे यांचेतर्फे मंत्रिमंडळाच्या बैठकीमधे मांडण्याकरता विनंती केली. ती त्यांनी मान्य करून लवकरात लवकर सेझग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवीण्यात येईल असे आश्वासन आमदार महेश बालदी यांनी सेझग्रस्त शेतकऱ्यांना दिले आहे.
कंपनीने खरेदी केलेली जमीन मिळकत १५ वर्षात न वापरल्यामुळे मार्च २०२२ पासून ५२३ शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे जमीन मिळकती परत करण्याकरीता उरण, पेण, पनवेल तालुक्यातील शेतकऱ्यांतर्फे ॲड. दत्तात्रेय नवाळे यांनी चौकशी अर्ज दाखल केले. त्यावर अंतिम सुनावणी होऊन आता प्रकरण अंतिम आदेशाकरीता ठेवण्यात आले आहे.