Sandes | हॉट्सअप-टेलीग्रामला बंदी, शासकीय कामकाजात आता ‘संदेस’चा वापर

राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राद्वारे शासनाचे अ‍ॅप विकसित

Big news! Ban on Whatsap-Telegram, now use of 'Sandes' in government work
शासकीय कामकाजात आता ‘संदेस’चा वापर
Published on
Updated on

रायगड : शासकीय कामकाजात सरकारी कर्मचार्‍यांना यापुढे हॉट्सअप आणि टेलीग्राम ही दोन संपर्कासाठीची अप्स वापरता येणार नाही. यापुढे सरकारी कर्मचार्‍यांना सरकारी कामासाठी फक्त ‘संदेस इन्स्टंट मैसेजिंग’ अ‍ॅपच (Sandes) वापरावे लागणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने नुकताच यासंदर्भातील आदेश जारी केला आहे.

केंद्र शासन आणि राज्य शासन शासकीय कार्यालये स्थानिक संस्थांमध्ये हजारो संदेशांची देवाणघेवाण होते. हे संदेश प्रामुख्याने मजकूर स्वरूपात असले तरी, ऑडिओ व्हिडिओ क्लिप आणि नस्ती इत्यादींमधील माहितीचीदेखील सुरक्षितपणे देवाणघेवाण होत असते, संदेस अ‍ॅप हे डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत आत्मनिर्भर भारताचा एक उपक्रम असून शासन ते शासन आणि शासन ते नागरिक असे संदेश सुलभ करण्यासाठी मुक्त स्रोत आधारित, सुरक्षित आणि स्वदेशी इन्सट्ंट मैसेजिंग प्लॅटफॉर्म देणारी प्रणाली आहे.

संदेस (Sandes) ही सुरक्षितपणे शासकीय पायाभूत सुविधांवर आधारित प्रणाली आहे. तिचे धोरणात्मक नियंत्रण शासनाकडे आहे. संदेस अ‍ॅप हे गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर कोणालाही डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. संदेस अ‍ॅपवरील माहितीची गोपनीयता आणि डेटा धारणा धोरणाद्वारे नियंत्रित केले जाते. सर्व वितरित झालेले संदेश एन्क्रिप्टेड स्वरूपात केवळ मर्यादित कालावधीसाठी साठवले जातात, कोणत्याही गैरवापराची तक्रार झाल्यास उगम शोधण्याची संदेस अ‍ॅपमध्ये क्षमता आहे. त्यामुळे शासकीय कामकाजासाठी इतर कोणत्याही अ‍ॅपचा वापर न करता संदेस हे राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राद्वारे (छखउ) तयार केलेल्या अ‍ॅपचा वापर करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.


Big news! Ban on Whatsap-Telegram, now use of 'Sandes' in government work
Zenith waterfall | झेनिथ धबधब्यावर अडकलेल्या अकरा पर्यटकांची सुखरूप सुटका

एनआयसीद्वारे विकसित करण्यात आलेल्या संदेस अ‍ॅपचा वापर केंद्र शासनातील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच विविध राज्य शासनांगवीले 200 हुन अधिक शासकीय संस्था यांच्याकडून तसेच 350 हून अधिक ई-गव्हर्नन्स अ‍ॅप्लिकेशनमध्ये संदेश, सूचना व ओ.टी.पी. पाठविण्यासाठी केला जात आहे. सदर अ‍ॅपचे विविधांगी कार्य तसेच उपयोग विचारात घेता, राज्य शासनामार्फत देखील शासकीय कामकाजात राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (छखउ) द्वारे विकसित करण्यात आलेल्या संदेस अ‍ॅपचा वापर करण्याबाबत सर्व विभाग व त्यांच्या अधीनस्थ शासकीय कार्यालयांना सूचना देण्यात येत असून संबंधित विभागांनी कार्यवाही करण्याचे पत्रकात म्हटले आहे.

संदेसची वैशिष्ट्ये (Sandes)

संदेश सुरक्षितपणे पाठवणे व प्राप्त करणे, सुरक्षित साठवण, ओटीपी पाउवणे व वितरित न झालेला ऊरींर सुरक्षित ठेवणे. शासन शासकीय कार्यालये यांच्या गरजेनुसार अनुकूलित करण्याची सुविधा, एनक्रिप्टेड मेसेज आणि फाइल पाठवण्यासाठी ईगव्ह अ‍ॅप्लिकेशनासह सेवा उत्पादित एकीकरण, अनौपचारिक आणि अधिकृत गट करण्याची सुविधा. डचड च्या ऐवजी ओटीपी, अ‍ॅलर्ट, सूचना व प्रसारण करणारी संदेश ही सुरक्षित व विनाशुल्क प्रणाली आहे. सत्यापित आणि सार्वजनिक वापरकर्त्यांमधील पृथक्करण, संदेश पोर्टलद्वारे शासकीय वापरकर्त्यांच्या पडताळणीचा पर्याय, संदेशच्या स्तरावर प्रोफाइल तपशिलांची दृश्यमानता लपविण्याची सुविधा. शासनासाठी योग्य जिमोजी (शासकीय इमोजी) आणि टॅगसह डिझाइन केलेले संवाद, डेस्कटॉप-लॅपटॉपसाठी संदेश वेब आवृत्तीची उपलब्धता, संदेस पोर्टलवरून संस्थेतील विशिष्ट वापरकर्त्यांसाठी संदेस प्रसारणाची सुविधा. पोर्टलवरून भूमिका आधारित व्यवस्थापन आणि देखरेख, आदी वैशिष्टये आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news