Sayaji Shinde: सह्याद्रीचे २३ प्रकल्प रद्द करा, मगच सह्याद्रीत पाऊल ठेवा; सयाजी शिंदे, विवेकानंद पाटील यांचा सरकारवर घणाघात

टोरंट पॉवरच्या प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पाला विरोध; सह्याद्रीतील २३ प्रकल्प रद्द करण्याची विवेकानंद पाटील यांची मागणी.
Sayaji Shinde
Sayaji ShindePudhari
Published on: 
Updated on: 

आनंद सकपाळ

नेरळ: कर्जत तालुक्यातील साय डोंगर परिसरात टोरंट पॉवरच्या प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पासाठी झालेल्या मोठ्या प्रमाणातील वृक्षतोडीचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहेत.

या वृक्षतोडीविरोधात कर्जतच्या टिळक चौकात आयोजित जाहीर सभेत ज्येष्ठ अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे तसेच विद्यार्थी नेते विवेकानंद पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार प्रहार केला.

Sayaji Shinde
Raigad teacher recruitment 2026: रायगडमधील ४२ शून्य शिक्षकी शाळांना अखेर गुरुजी मिळाले

सभेत बोलताना विवेकानंद पाटील यांनी सरकारच्या पर्यावरणविषयक भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला. पर्यावरणीय संवेदनशीलता केवळ भाषणांत न दाखवता प्रत्यक्ष कृतीतून दिसली पाहिजे. विकासाच्या नावाखाली सह्याद्रीचा विनाश सहन केला जाणार नाही, असा इशारा देत त्यांनी मुख्यमंत्री आणि राज्य सरकारने आधी सह्याद्रीतील २३ प्रकल्प रद्द करावेत, मगच येथे पाऊल ठेवावे, असे थेट आव्हान दिले.

Sayaji Shinde
Private school teacher jobs: शिक्षकभरतीसाठी वयोमर्यादा शिथिल खासगी शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही दिलासा

सरकार मायबाप नसून जनता मायबाप आहे, असे सांगत त्यांनी जनतेच्या एकजुटीतून हा लढा अहिंसेच्या मार्गाने पुढे नेण्याचे आवाहन केले. झाडांना केवळ लाकूड म्हणून पाहण्याच्या भूमिकेवर ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी कडक शब्दांत टीका केली. एका झाडावर संपूर्ण परिसंस्था अवलंबून असते, असे सांगत ते म्हणाले, हजारो वर्षांत तयार झालेल्या जंगलाची भरपाई काही हजार रोपे लावून होऊ शकत नाही.

नव्वद हजार झाडे लावणार असाल तर आधी ती नव्वद वर्षे वाढू द्या, मगच जंगल तोडण्याची परवानगी मागा. वनविभागाच्या निकषांवर बोट ठेवत त्यांनी गारंबीच्या वेली व औषधी वनस्पतींच्या संरक्षणाचीही मागणी केली.

विस्थापनाच्या वेदना आणि ऑक्सिजनची खरी श्रीमंती

स्वतः धरणग्रस्त असल्याचे सांगत सयाजी शिंदे यांनी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनातील त्रुटी मांडल्या. विस्थापनानंतर एका पिढीचे आयुष्य संघर्षात जाते, त्यामुळे स्थानिकांना बेघर करण्यापूर्वी त्यांच्या भविष्याचा विचार झाला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी घेतली.

आईच्या जन्मानंतर पहिला ऑक्सिजन झाडांमुळे मिळतो. शुद्ध हवा आणि पाणी हीच खरी श्रीमंती आहे. झाडे माझ्या आई-वडिलांसारखी आहेत, त्यामुळे ही वृक्षतोड म्हणजे आई-वडिलांना मारल्यासारखे वाटते,असे भावूक उद्गार त्यांनी काढले.

पेस नदीचे संरक्षण आणि १ लाख लोकांसह आंदोलनाचा निर्धार

पेस नदी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून जंगलासोबत नद्यांचे संरक्षण करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता एकजूट कायम ठेवल्यास भविष्यात एक लाख लोकांना सोबत घेऊन पुन्हा कर्जतमध्ये येऊ, असा निर्धार सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला. या सभेला पर्यावरणप्रेमी, स्थानिक नागरिक आणि विविध भागांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.