Private school teacher jobs: शिक्षकभरतीसाठी वयोमर्यादा शिथिल खासगी शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही दिलासा

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सरळसेवा नियुक्तीसाठी वयाची कमाल अट लागू राहणार नाही.
Teacher Recruitment
Teacher RecruitmentPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: राज्यातील मान्यताप्राप्त खासगी व्यवस्थापनांच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये सरळसेवेने नियुक्त होणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

या पदांवरील नियुक्तीसाठी आता कमाल वयोमर्यादेचे बंधन लागू राहणार नाही. त्यामुळे वयाची अट आड येत असल्याने नोकरीच्या संधीपासून दूर राहणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Teacher Recruitment
Bahirinath Festival: दिवाळे कोळीवाड्यात बहिरीनाथ सोहळ्याची अडीचशे वर्षांची परंपरा

अवर सचिव शरद माकणे यांनी तशा प्रकारचा शासन निर्णयच जाहीर केला आहे. महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मधील नियम ९ (४) (ब) नुसार खासगी व्यवस्थापनांच्या माध्यमिक (इयत्ता नववी ते दहावी) आणि उच्च माध्यमिक (इयत्ता अकरावी ते बारावी) शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सरळसेवा नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही.

Teacher Recruitment
Pradeep Purnekar Case: पप्या शिंदे, टल्लीच्या नार्को टेस्टला न्यायालयाचा नकार

यासंदर्भातील यापूर्वीच्या शासन निर्णयांमुळे क्षेत्रीय स्तरावर संभ्रम निर्माण झाला होता. याबाबत शासनाकडे विविध निवेदने प्राप्त झाली होती. हा संभ्रम दूर करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने स्पष्टीकरण जाहीर केले आहे.

वयोमर्यादेचा संभ्रम दूर

७ फेब्रुवारी २०१९, ७ मार्च २०१९ आणि ११ ऑगस्ट २०२६ रोजीच्या शासन निर्णयांमधील कमाल वयोमर्यादेसंबंधीच्या तरतुदी खासगी व्यवस्थापनांच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील सरळसेवा नियुक्त्यांसाठी लागू होणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.