

Conservation Architect Tanay Lalwani Maratha Forts UNESCO World Heritage Site
महाड : श्रीकृष्ण बाळ
भारतीय मराठा लष्करी वारशातील 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश होणे हा संपूर्ण देशासाठी अत्यंत अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे. या 12 किल्ल्यांमध्ये महाराष्ट्रातील 11 किल्ले - साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूमधील एक किल्ला - जिंजी यांचा समावेश आहे. हे किल्ले 17 व्या ते 19 व्या शतकातील मराठा लष्करी व्यवस्थेचे उत्कृष्ट प्रतिनिधित्व करतात.
हे किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीसाठी (iv) आणि (vi) या निकषांवरून नामांकित करण्यात आले. निकष (iv) अंतर्गत स्थापत्य, बांधकाम व भूशास्त्रीय वैशिष्ट्यांचे अप्रतिम उदाहरण म्हणून मान्यता दिली जाते; तर निकष (vi) अंतर्गत सांस्कृतिक परंपरा, श्रद्धा आणि मूल्यांशी संबंधित स्थळांना महत्त्व दिले जाते. मराठा किल्ले हे दोन्ही निकष पूर्ण करतात. ‘आज्ञापत्र’ या ऐतिहासिक ग्रंथात वर्णन केल्याप्रमाणे, हे किल्ले पर्यावरणाशी सुसंगत असून स्थापत्यशास्त्राचा अप्रतिम नमुना आहेत आणि शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेशी त्यांचा थेट संबंध आहे.
या प्रकल्पासाठी महाराष्ट्र पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने गुरगावस्थित DRONAH या संस्थेची नियुक्ती सल्लागार म्हणून केली. या संस्थेच्या वतीने पुण्याचे तरुण वास्तुविशारद अभियंता तनय ललवाणी यांच्यावर या महत्त्वपूर्ण प्रकल्पाची जबाबदारी सोपवण्यात आली.
DRONAH च्या संस्थापक संचालिका डॉ. शिखा जैन यांच्या मार्गदर्शनाखाली DRONAH च्या चमूने युनेस्कोच्या सांस्कृतिक श्रेणीत सर्वांत गुंतागुंतीच्या व महत्त्वाकांक्षी नामांकनांपैकी एक तयार केले. हे नामांकन 20 देशांच्या युनेस्को समितीच्या सदस्यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसादासह स्वीकारले आणि कौतुक केले. याव्यतिरिक्त, युनेस्कोचे सल्लागार संस्थे खउजचजड नेही आपल्या मूल्यांकन अहवालात या नामांकनाच्या गुंतागुंतीपणाची आणि वैशिष्ट्यांची प्रशंसा केली.
बालपणापासून सह्याद्रीतील किल्ल्यांबद्दल तनय यांचे अतूट प्रेम
आर्किटेक्ट तनय यांस सह्याद्रीतील किल्ल्यांबद्दल बालपणापासूनच विलक्षण आकर्षण होते. केवळ 5 वर्षांचे असताना, त्यांनी आपल्या वडिलांसोबत सिंहगड सर केला. किल्ल्यावर पोहोचल्यावर त्यांनी संपूर्ण किल्ला उत्साहाने व निरंतर फिरून पाहिला. त्याकाळीच त्यांची इतिहासप्रेमी वृत्ती आणि किल्ल्यांबद्दलची ओढ दिसून आली. शालेय काळात त्यांनी 3 पेक्षा अधिक किल्ल्यांची माहिती वर्तमानपत्रातील कात्रणांद्वारे एकत्र करून एक अल्बम तयार केला होता.
ANU कार्यक्रमातून ठरला दृष्टिकोन
या तीन वर्षांच्या Avahan–Nirman–Udhan (ANU) कार्यक्रमातून तनयला आपली ट्रेकिंग आणि किल्ल्यांबाबतची ओढ अधिक गहिरेपणाने समजली. सज्जनगडावर झालेल्या दुसर्या दुर्ग साहित्य संमेलनात, तनयच्या गटाने किल्ल्यांवरील प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला, जो शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते मिळाला. तनयचे किल्ल्यांवरील सखोल ज्ञान अनंत पालांडे, मृणाल कुलकर्णी, वीणा देव, उषा प्रभा पेजे, उमेश झिरपे, मिलिंद गुणाजी यांसारख्या तज्ज्ञांनी मान्य केले व गौरवले.
तनय ललवाणी हे युनोस्कोच्या प्रकल्पासाठी निवड झालेला महाराष्ट्रातील एकमेव आर्किटेक्ट आहेत. DRONAH या डॉ. शिखा जैन संचालित दिल्लीस्थित संस्थेकडे भारत सरकारतर्फे 12 किल्ल्यांचा प्रकल्प युनेस्कोला सादर करण्याची जबाबदारी होती. यामध्ये तनयने महत्त्वाचा सदस्य म्हणून भूमिका पार पाडली. तनयने शालेय जीवनापासूनच गिरीप्रेमी संस्थेसोबत ट्रेकिंगला सुरुवात केली. सज्जनगड येथे झालेल्या दुर्ग साहित्य संमेलनामध्ये प्रश्नमंजुषेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. कॉलेजमध्ये असतानाच गोदावरी व भीमा नद्यांच्या दरम्यान असलेल्या हेमाडपंथी देवळांचा अभ्यास करून त्यावर पुस्तक प्रकाशित केले.
तनय ललवाणी हे युनोस्कोच्या प्रकल्पासाठी निवड झालेला महाराष्ट्रातील एकमेव आर्किटेक्ट आहेत. DRONAH या डॉ. शिखा जैन संचालित दिल्लीस्थित संस्थेकडे भारत सरकारतर्फे 12 किल्ल्यांचा प्रकल्प युनेस्कोला सादर करण्याची जबाबदारी होती. यामध्ये तनयने महत्त्वाचा सदस्य म्हणून भूमिका पार पाडली. तनयने शालेय जीवनापासूनच गिरीप्रेमी संस्थेसोबत ट्रेकिंगला सुरुवात केली. सज्जनगड येथे झालेल्या दुर्ग साहित्य संमेलनामध्ये प्रश्नमंजुषेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. कॉलेजमध्ये असतानाच गोदावरी व भीमा नद्यांच्या दरम्यान असलेल्या हेमाडपंथी देवळांचा अभ्यास करून त्यावर पुस्तक प्रकाशित केले.