

खोपोली: जंतरमंतरवर काही दिवसांपूर्वी भारतातील विद्यार्थ्यांनी खुप मोठा लढा दिला त्या लढ्याला यश आलेला असून अहंकारी भाजप सरकारला झुकवलं आहे, अशी टिका आमदार रोहीत पवारांनी केली. ते पुढे बोलताना म्हणाले की पूर्वी युवकांच्या टी शर्टवर अपना टाईम आयेगा असे लिहिलेले असायचे पण मला त्या युवकांना सांगायचय की "अपना टाइम आयेगा" हे जुन झालाय.
आता आपला टाईम आलेला आहे. त्याचा प्रत्यय जंतरमंतरवर विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनातून दिसून आला असे ते म्हणाले. भाजपविरोधात बोलल्यावर ईडी, सीबीआयची भीती दाखवली जाते. पण आपण मराठी माणस दिल्लीसमोर झुकत नाही असा इशारा पवार यांनी दिला आहे. आघाडीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आघाडीची अजून इव्हीएम मशीनच आंदोलन बद्दल ती रणनीती नाही.
पण देशातील युवा ज्यांनी आंदोलन देशामध्ये उभे केले होते, ज्याला पाहून केंद्राचा अहंकार मोडला गेला होता. त्या युवाच्या संघटनेने निर्णय घेतला आहे. आपल्याला इव्हीएम बद्दल एक आंदोलन करावे लागेल. सर्वांचे मते ईव्हीएम हे लोकशाही व संविधानच्या विरोधात आहे. लोकांमध्ये कन्फ्युजन आहे. जसं पूर्वी बॅलेट पेपर वर मतदान केले जातं होते, तसेच मतदान केले जावे असे युवांची मागणी असल्याचेही पवारांनी सांगीतले.