

रोहे ः रोहा अष्टमी नगरपरिषद सर्वाधिक निवडणुकीचे मतदान काही अपवाद सोडल्यास शांततेत पार पडला आहे. रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी चांगले मतदान झाले आहे. थेट नगराध्यक्षपदाचे राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) वनश्री शेडगे व शिवसेना ( शिंदे गट )चे उमेदवार शिल्पा धोत्रे यांचे भवितव्य मतदाराने यंत्र पेटीत बंदिस्त झाले आहे. यासह नगरसेवकपदाचे 19 जागेसाठी 50 उमेदवारांचे भवितव्य यंत्र पेटीत बंदिस्त झाले आहे.
नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) व शिवसेना ( शिंदे गट ) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. खा. सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेना ( शिंदे गट ) ने आव्हान दिल्यामुळे या निवडणुकीला महत्त्व आले आहे.
रोहयात सकाळी साडेसात वाजता मतदाराला सुरुवात झाली. सकाळी थंडी असल्यामुळे सकाळच्या सत्रात मतदान संथगतीने सुरू झाले. मतदान सुरू झाल्यानंतर सकाळी 10.30 पर्यंत 10.93 टक्के मतदान झाले आहे.
सकाळी 7.30 ते 11.30 वाजे पर्यंत 24.87 टक्के मतदान झाले आहे.7.30 ते 1.30 पर्यंत 40.82 मतदान झाले.7.30 ते 3.30 पर्यंत 57.59 मतदान झाले. पोलीस उपविभागीय अधिकारी प्रसाद गोकुळे, पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
खा. सुनील तटकरे यांच्याकडून पाहणी
रोहा शहरात खा.सुनील तटकरे, माजी आ.अनिकेत तटकरे यांनी जातीने लक्ष घालीत भेट देत राष्ट्रवादी पक्ष ( अजित पवार गट) च्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली व मतदानाची माहिती घेतली. अनिकेत तटकरे रोह्यात ठाण मांडून होते.
प्रभाग 9 मध्ये उमेदवारांमध्ये राडा
रोह्यात भाजप व राष्ट्रवादी त वाद दिसुन आला प्रभाग 9 ब च्या उमेदवारांमध्ये राडा झाल्याचे दिसुन आले.दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची गर्दी केंद्राचे बाहेर दिसुन आले. पोलिंग बुथवरील बचाबचीचे कारण वादावादीचे असल्याचे बोलले जाते.पोलिसांनी त्वरित परिस्थितीवर ताबा घेत वातावरण शांत केले ा. नगरपरीषद 9 दोन मधील मशीन मध्ये नोटा चे बटन दाबत नसल्यामुळे 7 मिनट मशीन बंद होती ती पुन्हा चालु करण्यात आली.