

खांब : रोहा तालुक्यात कोलाड पाटबंधारे विभागाचे कालव्याचे पाणी अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या नावाखाली बंद असल्याने विभागातील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे पाणी सोडण्याची मागणी अनेकदा केली मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे पुन्हा दिसून येत आहे. येथील विभागीय शेतकऱ्यांनी याबाबत प्रशासनाला अनेकदा निवेदन दिले आहे आणि पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली. मात्र त्यावर पाटबंधारे खात्याचे केवळ आश्वासनेच दिली. या चुकीच्या धोरणांमुळे ओलिताखाली येणारी शेतजमीन नापीक होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे येथील बळीराजा आता अक्षरशः संतापाच्या भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे.
कुंडलिका सिंचन डोळवहाळ बंधारे रोहा तालुक्यातील सुरू असलेले उजवातीर डावातीर कळवा गेली अनेक वर्ष दुरुस्तीच्या नावाखाली बंद असल्याने पाटाच्या ओलिताखालील उजवातीर कालवा खांब, देवकान्हे, धामणसई या विभागातील शेतकऱ्यांना डोळवहाल सिंचनातून कोलाड पाटबंधारे विभाग अनेक वर्षे पाणी देत नाही. संबंधित कालवा दुरुस्तीची कामे करण्यात आली असली तरी शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही.तर येत्या वर्षात तसेच येथील देवकान्हे, धानकान्हे, चिल्हे, तळवली तर्फे अष्टमी या शेतकरी ग्रामस्थानी एकत्रित येऊन एकजुटीने खात्याला ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये कालव्यातील गाळ कचरा साफसफाई वेळेत पूर्ण करून उन्हाळी हंगामातील भातशेती लागवडीसाठी डिसेंबरपर्यंत पाणी सोडण्यासाठी आग्रही मागणी निवेदनातून केली होती.
तर सदरच्या निवेदन देण्यात आले प्रसंगी खात्याने स्वीकारून शेतकऱ्यांना दिलासादायक आश्वासन देत लगेचच कालव्याची सफाई करण्यात येणार आणि डिसेंबर 15 पर्यंत पाणी सोडले जाईल असे सांगण्यात आले तर कालव्याची साफसफाई होऊन तब्बल महिना उलटून गेला डिसेंबर महिना देखील या दोन दिवसात उलटून जाईल अद्याप कालव्याला पाण्याचा पत्ता नाही तर येथील बळीराजा शेतात धान पेरणीच्या तयारीत असून यासाठी पाटबंधारे विभाग शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी टाळाटाळ का करते. 15 डिसेंबर रोजी पाणी सोडण्याचे आश्वासन दिले होते.
अद्याप पाण्याचा पत्ता नाही त्यावर कुठे माशी शिंकली शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी नाही व्यापारी धोरणांसाठी आहे का असा सवाल उपस्थित होत आहे. गेली पंधरा वर्षे पाटबंधारे खात्याच्या आडमुठेपणाच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त होतेय. 15 डिसेंबरला पाणी सोडण्याचं आश्वासन दिलं, पण कुठे माशी शिंकली? शेतीची कामं लांबणीवर पडली.जबाबदार कोण?पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंते आणि वरिष्ठ अधिकारी मुख्यतः जबाबदार आहेत. त्यांचा हलगर्जीपणा आणि दुर्लक्ष शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवतंय.
शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन भंग झाल्याचे समोर आले आहे तर 15 डिसेंबरला पाणी सोडण्याचे जाहीर आश्वासन होते, पण धरणात पाणी असूनही शेतकऱ्यांना मिळाले नाही. यामुळे रब्बी हंगामाच्या पिकांची पेरणी रखडली. शेतकऱ्यांचं नुकसानशेतीची कामं उशिरा होतायत, उत्पादन घटणार. धनिकांना प्राधान्य, साध्या शेतकऱ्यांना दुर्लक्ष. कालव्याची साफसफाई कामे देखील पूर्ण झाली असल्याचे दिसून येत आहे तर धरणात पाणी असूनही उपासमार शेतकरी राजाची होते अशी स्थिती निर्माण होत आहे.
येथील कालवा गेली पंधरा वर्षापासून दुरुस्तीच्या नावाखाली बंद करण्यात आले होते. त्याचे काम देखील पूर्ण तत्वावर आहे शेतकऱ्यांना पाणी सोडावे यासाठी येथील सारे शेतकरी एकत्रित येऊन पाटबंधारे विभागाला निवेदन दिले. दरवर्षी निवेदन देण्यात येतो मात्र यावर्षी कालव्याला पाण्यासाठी आग्रही मागणी केली होती यावर्षीचा खरिपाचे पिक अवकाळी पावसामुळे कुजून गेला त्याची नुकसान भरपाई अद्याप मिळाली नाही. दरम्यान, कोलाड पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
कालव्याला पाण्यासाठी आग्रही मागणी पाटबंधारे खात्याकडे केली. त्यांनी मोठा निर्णय घेऊन वेळेत सफाई केली. 15 डिसेंबरपर्यंत पाणी सोडले जाईल असे आश्वासन दिले होते मात्र अद्याप पाण्याचा पत्ता नसल्याने येथील बळीराजा बी बियाणे घेऊन पेरणीच्या तयारीत असून अद्याप कालव्याला पाणी सोडले नाही त्यामुळे शेतकरी संतापले असून शेतकरी आंदोलनाची तयारी करतायत. असे देवकान्हे विभागीय शेतकरी किशोर भोईर यांनी सांगितले असून पाणी सोडतो एवढ्येच आश्वासन अजून देत असल्याने पाटबंधारे खात्याच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.