Kundalika river overflow: रोहा तालुक्यात रात्रभर धुवांधार, कुंडलिका नदी दुधडी भरून वाहू लागली

रोहा अष्टमी पुलाला लागले पाणी, पुलावरील वाहतूक बंद; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Kundalika river overflow
Kundalika river overflow
Published on
Updated on

महादेव सरसंबे

रोहे : रोहा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात रात्रभर जोरदार पाऊस पडला आहे. त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. रात्रभर पडलेल्या पडलेल्या पावसामुळे सकाळी कामानिमित्ताने जाणाऱ्या कामगार वर्गांना पावसामुळे अडचणी निर्माण होत होत्या. पहाटेपासून पावसाचा जोर रोहा तालुक्यात कायम असल्याचे दिसून येत आहे.

रात्रभर पडलेल्या पावसामुळे कुंडलिका नदी तुडुंब भरून वाहू लागले आहे. कुंडलिका नदी भरून वाहू लागल्याने कुंडलिका नदीवरील रोहा अष्टमीला जोडणारा पूलाला पाणी लागल्याने या पुलावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. मोठ्या पुलावरून सध्या वाहतूक सुरू आहे.

Kundalika river overflow
Roha Water Supply Scheme: रोहेकरांना शुद्ध पाणी देण्यासाठी आम्ही कटिबद्ध; पुढील पाच वर्ष पाणीपट्टी वाढविणार नाही: वनश्री शेडगे

रोहा शहरा नजीक असलेल्या भुवनेश्वर येथील भुवनेश्वर निवी रोडवर पाणी आले आहे. मोठ्या प्रमाणात येथील कालव्यातील पाणी रस्त्यावर आल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. रोहा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात रात्रभर पाऊस पडत आहे.दिवसभर असाच पाऊस राहिल्यास कुंडलिका नदीला पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Kundalika river overflow
Heavy rainfall in Raigad : जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला ! अंबा नदीने ओलांडली इशारा पातळी

सध्या पावसाचा जोर वाढत असून कुंडलिका नदीच्या पाण्याची पातळीही सातत्याने वाढत आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय कृपया घराबाहेर पडू नका आणि सुरक्षिततेला प्राधान्य द्या. घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. आपण सर्वांनी शांत राहून आवश्यक ती काळजी घ्यावी. मी, नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक आणि प्रशासन पूर्णपणे सतर्क असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहोत. कोणत्याही परिस्थितीत आम्ही आपल्या सोबत आहोत.अधिकृत सूचनांचे पालन करा आणि स्वतःची तसेच आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.

वनश्री अवनी समीर शेडगे, (नगराध्यक्षा, रोहा-अष्टमी नगर परिषद)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news