Roha Railway Station: रोहा रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार; सुनील तटकरेंकडून पाहणी, रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत चर्चा

सध्या सुरु असलेल्या विकासकामांची खा. सुनील तटकरे यांनी रेल्वे अधिकारी यांच्या समवेत रविवारी पाहणी करत आवश्यक त्या सुचना केल्या.
Roha Railway Station
Roha Railway StationPudhari
Published on
Updated on

रोहे: मध्य रेल्वरील शेवटचे स्थानक असलेले रोहा रेल्वे स्थानक अद्ययावत होत असून आंतरराष्ट्रीय विमानतळासारखे हे स्थानक केले जाणार आहे.सध्या सुरु असलेल्या विकासकामांची खा. सुनील तटकरे यांनी रेल्वे अधिकारी यांच्या समवेत रविवारी पाहणी करत आवश्यक त्या सुचना केल्या.

यावेळी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, नगराध्यक्ष वनश्री शेडगे, उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष समीर सकपाळ, राष्ट्रवादी तालुका कार्याध्यक्ष समीर शेडगे, सभापती महेश कोलाटकर, नीता हजारे, राजेंद्र जैन, नगरसेवक अजित मोरे, माजी नगरसेवक सुभाष राजे, यांच्यासह रोहा नगरपरिषद सभापती, नगरसेवक, रेल्वेचे अधिकारी, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Roha Railway Station
Maharashtra Prisons: तुरुंगात शिक्षा की यातना? गर्दीमुळे कैद्यांच्या मूलभूत सुविधांवर ताण

खा. सुनील तटकरे यांनी यावेळी रोहा रेल्वे स्थानकाच्या परिसराची पाहणी केली. मध्य रेल्वेवरील पनवेल रेल्वे स्थानकानंतर पेण व रोहा ही महत्त्वाची रेल्वे स्थानके आहेत. त्यांनी यावेळी रोहा रेल्वे स्थानकाचा परिसर अद्यावत होणार असून आंतरराष्ट्रीय विमानतळासारखे हे रेल्वे स्थानक येणार आहे.

रोहा रेल्वे स्थानकाप्रमाणेच पेणचही रेल्वे स्थानक अद्यावत होणार असून या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेले गणपती मुर्ती याचा विचार करून या संकल्पना वर हे रेल्वे स्थानक विकसित करण्यात येणार आहे. यासाठी संकल्पना तयार करण्याची संबंधितांना सूचना खासदार सुनील तटकरे यांनी दिल्या.

Roha Railway Station
Maharashtra Organ Donation: अवयवदानात आघाडी; तरीही २० हजार रुग्ण प्रतीक्षेत

यावेळी रेल्वे स्थानक कशा पद्धतीचे असणार आहे याची छायाचित्र दाखवण्यात आली. यावेळी रोहा, पेण रेल्वे संदर्भ समस्या प्रवासी संघटनेच्या वतीने खा. सुनील तटकरे यांना सांगण्यात आले लवकरात या संदर्भात खा. सुनील तटकरे यांची बैठक रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत होणार आहे.

२५ कोटींची विकासकामे केली जाणार

२५ कोटी खर्चून होणाऱ्या रोहा रेल्वे स्थानकाच्या अद्ययावत करण्यामध्ये स्वतंत्र रिक्षा पार्किंग, टू व्हीलर पार्किंग, फोरव्हीलर पार्किंग, रोहा रेल्वे स्थानक सुशोभिकरण, प्लॅटफॉर्म सुशोभिकरण, उद्यान असणार आहे. संपूर्ण रेल्वे स्थानक परिसर अद्ययावत करण्यात येणार आहे. लवकरच दोन्ही रेल्वे स्थानकाची प्रक्रिया पूर्ण करून निविदा काढण्यात येणार आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात रेल्वे स्थानक सुशोभिकरणाच्या कामाला सुरुवात होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news