

खांब : श्याम लोखंडे
रोहे तालुक्यातील धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या मुठवली खु. तसेच देवीची मुठवली म्हणून ओळखली जाणारी शिवकालीन स्वंयभू देवी रत्नाई भवानीमाता होय. तसेच भाविक भक्तांना कौल देणारी ही माता रत्नाई, भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी जाग्रुत देवस्थान म्हणून या ग्रामस्थांची ग्रामदैवत रत्नाई भवानी मातेची ख्याती या पंचक्रोशीसह सर्वत्र पसरलेली आहे.
रोहा शहर तसेच तालुक्याच्या ठिकाणापासून दीड ते दोन कि.मी. अंतरावर असलेल्या देवीच्या मंदिर समोरून कुंडलिकेच्या उद्रातून बारमाही वाहणारा कालवा तसेच उभी असलेली महापर्वताची रांग ऐतिहासिक निसर्गाचा हिरवा शालू साक्ष देणारे ठरत आहे. तसेच बारमाही भरती ओहटीतून वाहणारी कुंडलिका नदी, ऐतिहासिक शिवकालीन कालीन बारव, त्याचबरोबर काही अंतर मंदिर परिसरापासून नजिक असलेले श्री अक्कलकोट स्वामी महाराज यांचे हद्दीतील उडदवने येथील केंद्र, तर विशेष वैभव ऐतिहासिक साक्ष देणारे शिवकालीन गड म्हणजे अवचित गड आणि भूमीत वारकरीपरंपरेचा वारसा लाभलेली ही पंचक्रोशी तसेच मुठवली खु. गाव आहे.
येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आराध्य दैवत रत्नाई भवानी मातेचे मंदिराचे गाभार्यासह व सभागृही प्रशस्त व भव्यदिव्य स्वरूपात आहे. मंदिरात रत्नाई देवी मध्यभागी असून तिच्या उजव्या बाजूला वाघजाई, सोमजाई तर डाव्या बाजूला गणपती, विठ्ठल, शिवपिंडी व शिवपिंडी समोर नंदी, मंदिराचे दरवाजे पूर्वेच्या दिशेने असल्याने समोरून साक्ष देणारे चांदसूर्य, तसेच नवरात्रौत्सव काळात देवीला चांदीचे मुखवटे आणि दागिने पोशाखाचा साज चढविण्याची परंपरा आहे, तसेच भक्तांच्या विंतीचे कौल लावण्याचा उताळा अशी दैवतं वसली आहेत. मंदिरात दर मंगळवार व शुक्रवार रोजी शिवगर्जना मित्र मंडळ व ग्रामस्थांकडून महाआरती केली जाते.
पुर्वीचे मंदिर हे जुन्या बांधकाम पद्धतीचे होते तर 2013 साली ग्राम स्थांनी स्वखर्चाने भव्यदिव्य स्वरुपात प्रशस्त आणि सुसज्य मंदिर बांधले आहे. तसेच नवरात्रौत्सव काळात येथील ग्रामस्थ, महिला, युवक, युवती, तसेच सर्व ग्रामस्थ एकत्रित येऊन नऊ दिवस विविध उपक्रम तसेच धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम हरिपाठ,भजन, प्रबोधन, तसेच दांडिया उत्सव साजरा करण्यात येतो.
22 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या नवरात्रौत्सवासाठी मंदीर कळस आणि घुमूट मंदीर परिसर नवरात्रौत्सव काळात कना रांगोळी रंगी बेरंगी फुलांच्या माळा आणि रोषणाईने उजळून निघाले आहे, तर नवरात्रीचे नऊ दिवसांत या रत्नाई भवानी मातेच्या मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो. या उत्सव काळात रोहे तालुक्यासह, रायगड जिल्हा तसेच मुंबई, ठाणे व पुणे येथून मोठ्या संख्येने देवीचे भक्त आपले नवस बोलण्यासाठी व फेडण्यासाठी येतात. नवसाला पावणारी व मनातील इच्छा पूर्ण करणारी देवी म्हणून या देवीची ख्याती असल्याने येथे देवीला कौल देखील लावला जातो. तर भक्त सर्वप्रथम या रत्नाई भवानी मातेला विनंतीचे कौल लावतात, देवीने योग्य कौल दिल्यावर तोच कौल पुनः अष्टमी येथील बापदेव व रोह्याचे आराध्य दैवत श्री धाविर महाराजांना लावण्याचा त्या भाविकाचा परंपरा अथवा प्रघात आहे.