Roha Flood: रोह्यात पावसाचे थैमान, कुंडलिका नदीला महापूर

अष्टमी शहर पुराच्या पाण्यातच, शहराशी संपर्क तुटला; भुवनेश्वर, रोठखुर्द नागरीवस्तीत शिरले पाणी
Roha Flood
Roha FloodPudhari
Published on
Updated on

महादेव सरसंबे

रोहे: रोहा तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे कुंडलिका नदीला पूर आलेला आहे.रोहा तालुक्यातील कुंडलिका व अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे संपूर्ण परिसर पाणीमय झाल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे. तालुक्यातील संपूर्ण नदी नाले तुडुंब भरून वाहत असल्याचे चित्र आपणास पहावयास मिळत आहे. कुंडलिका नदीला पूर आल्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.

कुंडलिका नदीला पुर आल्यामुळे अष्टमी शहर व रोहा शहराच्या काही भागांमध्ये पाणी शिरले होते. पुन्हा एकदा. रात्र अष्टमीकरांनी जागुन काढली आहे. अष्टमी शहर पुराच्या पाण्याने वेढलेला होते. रोहयाशी त्यांचा संपर्क तुटला होता.

Roha Flood
Alibag Heavy Rain landslide: अलिबाग तालुक्यात अतिवृष्टीनंतर चार ठिकाणी भूस्खलनाच्या घटना; सुदैवाने जीवितहानी टळली

रोहा अष्टमीला जोडणारा जुना पूल पाण्याखाली गेला आहे. तर मोठ्या मुलाच्या दोन्ही बाजूंनी पाणी असल्याने हा पुल सध्या रहदारीला बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागोठणे, पाली, मुंबई, अलिबाग याकडे जाणाऱ्या प्रवासांचे हाल झाले आहे. संपूर्ण रहदारी बंद आहे, दुसरीकडे रोहा कोलाड मार्ग ही सध्या बंद आहे त्यामुळे रोहयातुन तळ कोकणात ही नागरिकांना जाता येत नाही. रोहा शहरातील कुंडलिक नदीच्या काठावर असलेल्या नागरी वस्तीत पाणी शिरले आहे.

रोहा शहरातील दमखाडी, शहरा नजीक असलेल्या भुवनेश्वर व रोठखुर्द नागरीवस्तीत पाणी शिरले आहे. अष्टमी शहरात, दमखाडी परीसर, रोहा कोलाड मार्गावर पाणी होते. नागरिकांचे हाल झाले असुन नगरपरिषदेकडून मदतीचा हात पुढे करण्यात येत होत. तालुक्यातील कुंडलिका नदीच्या काठावर असलेल्या गावातही पाणी शिरले आहे.

मध्यरात्रीपासून कुंडलिका नदीमध्ये पाणी वाढण्यास सुरुवात झाली पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे नागरी वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याचे चित्र रोहा तालुक्यात होते.रेस्क्यू टीम रात्रभर तालुक्यातील ठीक ठिकाणी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवत आहेत.

नगराध्यक्ष वनश्री शेडगे व त्यांच्या टीमने बोटीने अष्टमी शहरातील पाण्याची पाहणी केली आहे. सामाजिक संस्था व रेस्क्यू टीम तैनात करण्यात आले होते.अडकलेल्या नागरिकांना रेस्क्यू टीम कडून बाहेर काढण्याचे काम चालू होते. एसव्हीएसएसआर, एनव्हीएस एस आर, न. प. व पोलीस यंत्रणा सतर्क होते.

Roha Flood
Khandala Ghat News: समाजसेवेचा वसा जीवावर बेतला! खंडाळा घाटात मदतकार्य करताना जबर मार लागून तरुणाचा मृत्यू

कुंडलिका नदीला पूर आल्यामुळे रोहा कोलाड मार्गावर रस्त्यावर पाणी आले आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद झाली आहे. एसटी बसेस नवरत्न हॉटेल जवळ थांबवण्यात आले होते. या मार्गावरच धाटाव औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारखाने आहेत या कारखान्यात जाणारा कामगारांचे हाल झाले.

रोहा-कोलाड मार्ग बंद असल्यामुळे महाड व तळ कोकणात जाणाऱ्या प्रवासांचेही हाल झाले आहेत. पाण्यामुळे रेल्वे स्टेशनला जाता येत नसल्यामुळे प्रवाशांना रेल्वेनी ही जाता येत आले नाही.

नागोठणे, रोहा कोलाड मार्ग बंद असल्याने कामगारांचे हाल झाले असुन नुकसान सुध्दा झाले पुरामुळे कामावर जात नसल्यामुळे त्यांची रजा लागली आहे. नगराध्यक्ष वनश्री शेडगे, उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, सभापती राजेंद्र जैन, महेश कोलाटकर, मयुर दिवेकर, निता हजारे, मुख्याधिकारी अजयकुमार एडके, पो. नि. मारुती पाटील, नायब तहसीलदार राजेश थोरे प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन परीस्थिती वर लक्ष ठेवून आहेत.

यंत्रणांना सतर्क राहण्याच्‍या सुचना

खा.सुनील तटकरे, ना.आदीती तटकरे व आ.अनिकेत तटकरे यांचे पुर परीस्थिती कडे लक्ष ठेवुन आहेत. अधिकाऱ्यांना योग्य सूचना दिले आहेत. त्यांनी पुरात अडकलेल्या नागरीकांना बाहेर काढण्यासाठी तात्काळ बोटींची व्यवस्था करण्यात आले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. नगरपरिषद यंत्रणा, वीज मंडळ, आपत्ती कालीन व्यवस्थापन यंत्रणा, पोलिस यंत्रणा, महसुल व आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचा सुचना दिल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news