Khandala Ghat News: समाजसेवेचा वसा जीवावर बेतला! खंडाळा घाटात मदतकार्य करताना जबर मार लागून तरुणाचा मृत्यू

रस्त्यात पडलेला वृक्ष बाजूला करताना घडली घटना
Khandala Ghat News
Khandala Ghat NewsPudhari
Published on
Updated on

खोपोली: वाहतुकीला अडचण करीत असल्याने शिळफाटा येथील तरुण मदतीसाठी सरसावले आणि एका वाहनांच्या साह्याने बाजूला करीत असताना झाड खेचत असताना टककले आणि त्याची फांदी अमन मुजावर या तरुणाच्या छातीत बसल्याने त्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

गेले चार पाच दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक तरुण समाजसेवा या भावनेतून मदतीसाठी पुढे येत असल्याचे आणि ठिकाणी दिसत आहेत मग कुठे अपघात असो वा गावात कुठली आपत्कालीन घटना असो याठिकाणी सामाजिक भावनेतून अनेक तरुण पुढे येत आहेत असाच काही समाजसेवेचा वसा घेतलेल्या तरुणांनी खंडाळा घाटात एक वृक्ष रस्त्याच्या मधोमध पडला होता.

Khandala Ghat News
Panvel Assault Investigation: गतिमंद तरुणीवर लैंगिक अत्याचार; प्रसूतीनंतर धक्कादायक प्रकार उघड

काही वृक्ष रस्त्यावर पडून वाहतुकीला अडचण होत असल्याने अनेक समाजीक संस्था सामाजिक कार्यकर्ते तरुण वर्गाचा ग्रुप मदतीसाठी पुढे येत असल्याचे चित्र खोपोली खालापूर सह सर्वत्र दिसत आहेत.

मंगळवारी दुपारच्या दरम्यान खंडळा घाटात रस्त्यावर एक वृक्ष कोलमडून पडल्याने वाहतुकीला अडचण होत असल्याने त्याच वेळेस शिलफाटा येथील तरुणांचा ग्रुप या ठिकाणी गेला असता सामाजिक भावनेतून या तरुणांनी वृक्ष हटविण्यासाठी मदत कार्यासाठी सरसावले.

हे भले मोठे वृक्ष एका वाहनांच्या साह्याने दोरी बांधून बाजूला करीत असताना हे झाड सटकले आणि त्याची फांदी अमन याच्या छातीत जोरात बसल्याने त्याला जबर मुका मार लागला. त्यांनतर त्याला त्रास जाणवू लागल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. अमन मुजावरची समाजसेवा जीवावर बेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Khandala Ghat News
Raigad landslide : सडे गावावर दरडीचे संकट; १३ कुटुंबांतील ३७ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर

समाजसेवा बेतली जिवावर

अनेकजण समाजसेवा करताना आपली स्वत:च्या सुरक्षेची काळजी घेत नाहीत. ज्यावेळेस मदतीची गरज असते त्यावेळेस येथील धोकाही पाहिला पाहिजे. प्रसंगावर त्यावर मात करीत स्वताची काळजी घेऊन समाजसेवेत सक्रिय राहिले पाहिजे.

खंडाळा घाटात वृक्ष बाजूला करताना गाडीला वृक्ष व्यवस्थित न बांधता त्या पाठोपाठ मागे जाणे अमनला महागात पडले आणि वृक्षाचा फटका जिव्हारी आणि जीव गमवावा लागला. त्याच्या पाठीमागे आशेने भविष्याचा आधार म्हणनू पाहणारे आई-वडील आणि कुटुंब पोरके झाले अशी प्रतिक्रिया उमटत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news