Roha Farmer Success: रोह्यात प्रयोगशील शेतीचा यशस्वी प्रयोग; मिरची व कलिंगडातून लाखोंचे उत्पन्न

कमी जमिनीत शास्त्रोक्त लागवड करून खेळु थिटे यांची कमाई; नव्या शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण
Roha Farmer Success
Roha Farmer SuccessPudhari
Published on
Updated on

रोहे : महादेव सरसंबे

रोहा तालुक्यातील बाहे हे गाव भाजीपालासाठी पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. पारंपारिक लागवडीपासून विविध प्रयोग करीत आज येथील शेतकरी शेतीतून चांगले उत्पादन काढून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. यातीलच बाहे येथील प्रयोगशील शेतकरी खेळु थिटे यांनी कमी जागेत शास्त्रोक्त पद्धतीने लागवड करून मिरची पिकातून भरघोस उत्पादन काढत आहेत. त्यांचा झालेला यशस्वी प्रयोग नवीन शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.

Roha Farmer Success
Jan Dhan Yojana Konkan: कोकणात जनधन योजनेची झेप; 55 लाख खाती, ठाणे-रायगडमध्ये कोट्यवधींच्या ठेवी

मुळातच खेळू थिटे यांच्याकडे शेती कमी परंतु जिद्द, मेहनतीच्या जोरावर शेतीतून चांगले उत्पन्न मिळते हे त्यांनी गेले कित्येक वर्ष सिद्ध केले आहे. लाखोचे उत्पन्न कमी शेतीत कसे काढता येते. हे त्यांनी नवा शेतकऱ्यांसमोर उदाहरण ठेवला आहे. सातत्याने शेतीमध्ये प्रयोग करत असल्याने कृषी क्षेत्रातील भात लागवडीपासून अन्य पुरस्कार त्यांना शासनासह विविध संस्थेचे मिळाले आहेत.

Roha Farmer Success
BJP Raigad Election: भाजपची ताकद वाढली : स्वबळावर निवडणूक लढण्याचा विश्वास

स्वतःची दीड एकर व सामायिक अडीच एकर असे एकूण चार एकर मध्ये त्यांनी या वर्षी शेतीमध्ये लागवड केली आहे. यावर्षी सितारा या जातीची मिरचीची लागवड पाऊण एकर मध्ये त्यांनी नोव्हेंबरच्या सुमारास केली होती.जवळजवळ 80 हजाराच्या आसपास त्यांना या लागवडीचा व अन्य खर्च आला. चांगले नियोजन व संगोपन केल्याने मिरचीचे पीक आता बहरत आहे.आता शेतीचे उत्पादन सुरू झाले आहे. चांगले मिरचीचे पीक बहरत असताना त्यांनी आतापर्यंत तीन तोडे केले आहेत. जिल्ह्यातील व्यापारी शेतावर मिरची खरेदी करण्यासाठी येत आहेत. यावेळी त्यांना 40 ते 60 रुपये किलोमागे भाव मिळाला आहे. आतापर्यंत तीन तोडे त्यांनी केले आहे सरासरी दीड लाखाच्या आसपास उत्पन्न मिळाले आहे अजूनही दोन ते तीन तोडे होणार असल्याचे त्यांनी सांगितले. अंदाजे किमान अडीच लाखाच्या आसपास पाऊण गुंठ्यात त्यांना नफा मिरची या पिकातून मिळण्याची शक्यता आहे. भावात चढ-उतार सातत्याने होत आहे. अजूनही उत्पादन त्यांचे मिरची या पिकातून आहे.

Roha Farmer Success
Raigad Illegal Schools: सावधान! रायगडात 35 अनधिकृत शाळा उघडकीस

रोहासारख्या बाजारपेठेत स्थानिक शेतकऱ्यांना उत्पादन विक्रीसाठी जागा उपलब्ध नसल्याने त्यांना स्थानिक बाजारपेठ मिळत नाही. स्थानिक बाजारपेठेत जागा बसण्यासाठी जागा मिळाल्यास चांगले उत्पन्न त्यांना मिळू शकते. यासह रोहेकरांना ताज्या भाज्या खाण्यासाठी मिळू शकतात.

खेळु थिटे, प्रयोगशील शेतकरी, बाहे

रोहा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण काम करणार असून यासह स्थानिक शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

अनंत थिटे, शेतकरी नेते

Roha Farmer Success
Farmer Land Partition| अवघ्या २०० रुपयात जमिनीची वाटणी! शेतकऱ्यांसाठी शासनाचा मोठा दिलासा

त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या पाऊण एकर मध्ये त्यांनी यावर्षी प्रायोगिक तत्त्वावर कलिंगडाची लागवड केली आहे. अडीच हजार रोपे त्यांनी यावेळी कलिंगडाची पाहुण एकर मध्ये लावले होते. कलिंगड येथेही चांगले पिक आल्याने त्यांना चांगले उत्पन्न मिळाले आहे. सरासरी 15 चा भाव किलोमागे यावेळी त्यांना कलिंगडाला मिळाला असून जवळ जवळ 10 टन कलिंगडाचे उत्पादन यावेळी निघाले आहे. किरकोळ बाजारात त्याची विक्री होत आहे. मिरची या पिकासोबत कलिंगडाच्या पिकातूनही त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे.

सध्या ते पाऊण एकरामध्ये भेंडीचे लागवड केली आहे राधिका या जातीचे लागवड त्यांनी यावेळी भेंडी या पिकाची केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news