

रोहा अष्टमी नगरपरिषदेवर राष्ट्रवादी पक्षाचे वर्चस्व कायम राहिले असून भाजप व शिवसेना (शिंदे गट) प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाले आहेत. थेट नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) वनश्री समीर शेडगे विजयी झाल्या आहेत. खासदार सुनील तटकरे यांच्या विकासकामांच्या बाजूने रोहेकरांनी कौल दिल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्रात प्रतिष्ठित असलेल्या रायगड जिल्ह्यातील रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून रोहा अष्टमी नगरपरिषदेवर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा (अजित पवार गट) झेंडा फडकला आहे.
रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) प्रभाग क्रमांक २ ब मधून राजेंद्र जैन हे बिनविरोध निवडून आले होते. थेट नगराध्यक्षपदासह उर्वरित १९ जागांसाठी लढत झाली. मतमोजणीअंती बिनविरोध निवडून आलेल्या राजेंद्र जैन यांच्यासह राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) एकूण १८ उमेदवारांनी विजय मिळवला आहे. या निवडणुकीत नव्याने भाजपने खाते उघडले असून भाजपचा एक व शिवसेना (शिंदे गट)चा एक उमेदवार निवडून आला आहे.
थेट नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी (अजित पवार गट)च्या वनश्री समीर शेडगे यांनी शिवसेना (शिंदे गट)च्या शिल्पा धोत्रे यांच्यावर दणदणीत विजय मिळवला असून त्या थेट नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत.
रोहा अष्टमी नगरपरिषदेवर पुन्हा एकदा राष्ट्रवादी (अजित पवार गट)चा झेंडा फडकला असून खासदार सुनील तटकरे, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे व माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या विकासकामांच्या बाजूने रोहेकरांनी कौल दिल्याचे दिसून आले आहे.
रोहा अष्टमी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी रोहा शहरातील ज्येष्ठ नागरिक सभागृहात सकाळी १० वाजता सुरू झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. किशोर देशमुख यांनी काम पाहिले. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रसाद गोकुळे व पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा शहरात, मतमोजणी केंद्र व परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मतमोजणी अंतिम उमेदवारांची आकडेवारी पाहता
थेट नगराध्यक्ष
सौ. शिल्पा अशोक धोत्रे शिवसेना मते ३८९१,
शेडगे वनश्री समीर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मते ८५८६ विजयी
नोटा २३१,
प्रभाग क्रमांक १ अ
श्रीमती पूजा नितेश ऐनकर शिवसेना मते ५३३,
हजारे नीता महेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मते ६६३ विजयी,
जाधव मीना देविदास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मते २८१,
नोटा ३५,
प्रभाग क्रमांक १ ब
म्हैसकर अब्दुल रज्जाक मुश्ताक अपक्ष मते ३४३,
बोथरे महेश मोहन शिवसेना मते १९३,
साळवी विकास मारुती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मते ४३,
कडू प्रशांत बंडू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मते ४६२ विजयी,
लांजेकर मनोज हरिश्चंद्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मते ४५५
नोटा १६
प्रभाग क्रमांक २ अ
नाडकर आस्मा रफिक अपक्ष मते ५१४,
पानसरे फराह यासीन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मते ७०१ विजयी,
नोटा ३७,
प्रभाग क्रमांक २ ब
जैन राजेंद्र वस्तीमल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बिनविरोध
प्रभाग क्रमांक ३ अ
चोगले फातिमा जुबेर अपक्ष मते २५९,
सावरटकर आयेशा वसिम शिवसेना मते २१५,
रोगे आफरीन अ.कादीर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मते ६३६ विजयी,
नोटा ८
प्रभाग क्रमांक ३ ब
मंगेश अशोक रावकर शिवसेना मते ३००,
मणेर अरबाझ इरफान राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मते ७७०,
नोटा ४८,
प्रभाग क्रमांक ४ अ
सौ.नूतन निलेश शेडगे शिवसेना मते २४८,
शेडगे राखी राकेश भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मते ७२,
अंबरे स्नेहा शिरीष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मते ६१८ विजयी,
रोहेकर नजियाबेगम मीरहसन अपक्ष मते ३७२,
नोटा ४
प्रभाग क्रमांक ४ ब
महाडकर अजीज बशीर शिवसेना मते ४९१,
दर्जी अहमद हसनमिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मते ७८६ विजयी,
नोटा ३७,
प्रभाग क्रमांक ५ अ
वासकर शमीम इजाज अपक्ष मते २६३,
कागदी शाहीन उस्मान शिवसेना मते ८७,
पेडेकर यास्मिन फैजान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मते ६१,
गुंदेशा नीता राकेश अपक्ष मते १६८,
मुमेरे आलमास अब्दुल आलिम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मते ३७० विजयी,
नोटा १२,
प्रभाग क्रमांक ५ ब
गुजर महेंद्र रमेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मते ६४४ विजयी,
कुशवाह लालताप्रसाद बद्रीप्रसाद शिवसेना मते २७७,
नोटा ४०,
प्रभाग क्रमांक ६ अ
बारटक्के गौरी प्रेषित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मते ५५५ विजयी,
पी.व्ही. ज्योती सनीलकुमार भारतीय जनता पार्टी मते १५७,
देशमुख बेबी शिवाजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मते ४३९,
नोटा २६,
प्रभाग क्रमांक ६ ब
दिवेकर महेंद्र रामभाऊ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मते ७६९ विजयी,
कापरे राजेश प्रभाकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मते ३८४,
नोटा २४,
प्रभाग क्रमांक ७ अ
कोळी अनिता प्रकाश शिवसेना मते ६४०,
धनावडे प्रियंका स्वप्निल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मते ७७६ विजयी,
नोटा २०,
प्रभाग क्रमांक ७ ब
जगताप धनश्री दत्तात्रेय शिवसेना मते ४२८,
चाळके रवींद्र सुधीर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मते ९९२ विजयी,
नोटा १६
प्रभाग क्रमांक ८ अ
श्रीमती श्रद्धा कन्हैया पडवळ शिवसेना मते ४९८,
शिंदे संजना समाधान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मते ६८५ विजयी,
नोटा ८
प्रभाग क्रमांक ८ ब
कोलाटकर महेश गोपीनाथ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मते १०५४ विजयी,
मंगेश अशोक रावकर शिवसेना मते १२८
नोटा १२
प्रभाग क्रमांक ९ अ
जाधव सुप्रिया अनंत शिवसेना मते ६३९ विजयी,
पवार अश्विनी राकेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मते ६१५,
नोटा ६७
प्रभाग क्रमांक ९ ब
सकपाळ समीर रवींद्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मते ४९६,
चाफेकर रोषण विष्णू भारतीय जनता पार्टी मते ८१५ विजयी,
नोटा १०,
प्रभाग क्रमांक १० अ
गुरव नेहा ओमकार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मते ५३८,
सौ पूर्वा पप्पू मोहिते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मते ८३२ विजयी,
नोटा ५६,
प्रभाग क्रमांक १० ब
सावंत विनोद प्रताप भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मते ८९,
रिसबूड सुमित विलास भारतीय जनता पार्टी मते ४२६,
मोरे अजित जनार्दन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मते ८८८ विजयी,
नोटा २३
प्रभाग क्रमांक १ ब
म्हैसकर अब्दुल रज्जाक मुश्ताक (अपक्ष) – मते ३४३
बोथरे महेश मोहन (शिवसेना) – मते १९३
साळवी विकास मारुती (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) – मते ४३
कडू प्रशांत बंडू (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) – मते ४६२ (विजयी)
लांजेकर मनोज हरिश्चंद्र (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) – मते ४५५
नोटा – १६
प्रभाग क्रमांक २ अ
नाडकर आस्मा रफिक (अपक्ष) – मते ५१४
पानसरे फराह यासीन (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) – मते ७०१ (विजयी)
नोटा – ३७
प्रभाग क्रमांक २ ब
जैन राजेंद्र वस्तीमल (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) – बिनविरोध
(उर्वरित प्रभागांचे निकाल, मते व विजयी उमेदवार मूळ माहितीप्रमाणे कोणताही बदल न करता ठेवले आहेत.)