Kurundwad Municipal Election 2025|कुरुंदवाड पालिकेत राजर्षी शाहू आघाडीचा ऐतिहासिक विजय

Kurundwad Municipal Election 2025| कुरुंदवाड पालिकेत राजकारणाची नवी समीकरणे आकाराला
Kurundwad Municipal Election 2025
Kurundwad Municipal Election 2025
Published on
Updated on

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा
कुरुंदवाड नगरपालिकेच्या निवडणुकीत राजर्षी शाहू आघाडीने जोरदार मुसंडी मारत पालिकेत स्पष्ट बहुमत मिळवले असून नगरपालिकेत सत्तांतर घडवून आणले आहे. या निवडणुकीत राजर्षी शाहू आघाडीच्या मनीषा उदय डांगे यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवार योगिनी पाटील यांचा तब्बल दोन हजार मतांच्या मताधिक्याने पराभव केला. भाजपच्या उमेदवाराची या लढतीत मोठी घसरण झाली आहे.

Kurundwad Municipal Election 2025
Peth vadgaon Municipal Council Election Results 2025 | वडगावात ‘ताईराज’; विद्याताई पोळ नगराध्यक्षपदी, यादव आघाडीला 15 तर जनसुराज्य- ताराराणीला 5 जागा

संपूर्ण निवडणुकीत राजर्षी शाहू आघाडीने प्रभावी रणनीती राबवत नगराध्यक्षपदासह १३ नगरसेवक निवडून आणले. काँग्रेस पक्षाला आठ नगरसेवकांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे नगरपालिकेतील सत्तेवर आघाडीची पकड अधिक मजबूत झाली आहे. या यशामागे आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे परफेक्ट नियोजन निर्णायक ठरले. तसेच रामचंद्र डांगे यांनी निवडणूक प्रक्रियेत घेतलेली संयमाची व समन्वयाची भूमिका सत्ता स्थापनेसाठी अत्यंत ‘करेक्ट कार्यक्रम’ ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

२०१६ साली झालेल्या मागील निवडणुकीत अवघ्या १२० मतांच्या फरकाने पराभूत होत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवून पाच नगरसेवक निवडून आणणाऱ्या भाजपाची यावेळी मोठी घसरण झाली असून पक्षाला जबरदस्त धक्का बसला आहे. दुसरीकडे, मागील वेळी नगराध्यक्षांसह पाच नगरसेवक निवडून आणत सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षालाही आपली सत्ता अबाधित ठेवता आली नाही.

एकूणच, या निवडणुकीत मतदारांनी स्पष्ट कौल देत राजर्षी शाहू आघाडीवर विश्वास व्यक्त केला असून कुरुंदवाड नगरपालिकेत नव्या नेतृत्वाखाली विकासाचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नगरपालिकेच्या दहा प्रभागांमध्ये पुढीलप्रमाणे उमेदवार विजयी झाले—

प्रभाग क्रमांक १
संगीता कर्नाळे, रमेश भुजुगडे
(दोघेही – राजर्षी शाहू विकास आघाडी)

प्रभाग क्रमांक २
दीपक परीट, अलका पाटील
(दोघेही – काँग्रेस)

प्रभाग क्रमांक ३
तानाजी आलासे (काँग्रेस)
विमल पोमाजे (राजर्षी शाहू विकास आघाडी)

प्रभाग क्रमांक ४
बाबासो कडाळे, सुनंदा आलासे
(दोघेही – राजर्षी शाहू विकास आघाडी)

प्रभाग क्रमांक ५
जयश्री पाटील, अक्षय आलासे
(दोघेही – राजर्षी शाहू विकास आघाडी)

Kurundwad Municipal Election 2025
Jaisingpur Municipal Council Election Results 2025 | जयसिंगपुरात विरोधकांच्या एकजुटीला मतदारांनी नाकारले, पालिकेवर आमदार यड्रावकर यांची सत्ता

प्रभाग क्रमांक ६
सुजाता जाधव (काँग्रेस)
जवाहर पाटील (राजर्षी शाहू विकास आघाडी)

प्रभाग क्रमांक ७
आयेशा बागवान, प्रदीप चव्हाण
(दोघेही – काँग्रेस)

प्रभाग क्रमांक ८
रुकसाना बागवान (काँग्रेस)
वैभव उगळे (राजर्षी शाहू विकास आघाडी)

प्रभाग क्रमांक ९
अलका मधाळे, दीपक गायकवाड
(दोघेही – राजर्षी शाहू विकास आघाडी)

प्रभाग क्रमांक १०
विशाल पाटील (काँग्रेस)
जुबेरिया गोलंदाज (राजर्षी शाहू विकास आघाडी)

या निवडणुकीत राजर्षी शाहू विकास आघाडीने बहुतांश प्रभागांमध्ये सातत्य राखत बहुमत मिळवले, तर काँग्रेसने काही प्रभागांमध्ये प्रभावी लढत दिली. महिला उमेदवारांची संख्या आणि त्यांचा विजय हे या निवडणुकीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले. नगराध्यक्षपदी मनीषा उदय डांगे यांच्या निवडीमुळे शहरातील विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news