

अलिबाग ः नातेसंबंधातील ताणतणाव प्रेम संबंध पालकांबाबतची नाराजी यातून जिल्ह्यातील अल्पवयीन मुला मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत म्हणजेच साधारणतः 9 महिन्यात 52 मुले बेपत्ता होण्यासंदर्भात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुणे दाखल झाले आहेत.
जिल्ह्यात अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. प्रेमप्रकरण किंवा घरगुती वादातून असे प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे . मागील वर्षात 102 मुले बेपत्ता झाली आहेत. त्यापैकी 98 मुलांना परत आणण्यात पोलिसानं यश आले आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागातील मुलांचे पळून जाण्याचे प्रमाण जास्त आहे. यावर्षी म्हणजेच 2025 मध्ये 52 मुले बेपत्ता झाली होती याप्रकरणी रायगड पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करीत 49 गुन्ह्यांचा उलगडा करण्यात यश मिळवले आहे. पालकांनी आपल्या मुलींशी मनमोकळे पणाने संवाद ठेवल्यास अशा प्रकारांना आळा बसू शकतो .
मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच अल्पवयीन मुली संशयास्पदरित्या बेपत्ता होण्यामुळे पालकांपुढील चिंता वाढते आहे. मागील काही वर्षांत अज्ञातांकडून घडलेल्या अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमुळे मुली बेपत्ता होण्याच्या प्रकारांकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. बचपन बचाव आंदोलनकर्त्यांनी 2011 मध्ये न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने 18 वर्षांपेक्षा कमी असलेल्या मुलगा बेपत्ता झाल्यास अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यास अपहरणाचा गुन्हा नोंद करीत तपास करण्यात येत आहे.
पोलीस तपासात बहुतांश गुन्हांना प्रेमसंबंधाची किनार असल्याचं समोर आहे आहे. तर काही प्रकरणात पालकांबद्दल मुलांच्या मनात असलेला राग , नातेसंबंध ह्यामधील ताणतणाव कारणीभूत ठरल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे या गुन्ह्याकडे आणि पळून जाणाऱ्या मुला मुलींकडे संवेदनशीलपणे पाहणे गरजेचे आल्याचे मत मानसोपचारतज्ञ विकत करतात. पालकांनी अशा मुलामुलांची मानसिकता समजून घ्यायला हवी, त्यांच्यावर चागले संस्कार करायला हवे व्यक्ती स्वातंत्र सैराचार यातील फरक मुलानं लक्षात आणून द्यायला हवा.
कौटुंबिक जबाबदारीची वेळच्यावेळी जाणीव करून द्यायला हवी जीवन जगण्याचे कसब त्यांना आत्मसात करून द्यायला हवे शाळेत आणि महाविद्यालयात मुलांचे मानसिक समुपदेशन कार्याला हवे. गरज भासल्यास त्यासाठी पालकांनी भरोसा सेल ची मदत माजमाध्यमे आणि माध्यमांवर दिसणाऱ्या घटनांचा परिणाम मुलांमुलींच्या मनावर होत असतो. काही वेळेला घरातील परिस्थिती त्याला कारणीभूत ठरते.