Revdanda Lightning: धक्कादायक! रेवदंड्यात पेट्रोल पंपाजवळ वीज कोसळून ताडाच्या झाडाला आग; मोठी दुर्घटना टळली

Revdanda Lightning Incident: रेवदंडा येथे विजेच्या कडकडाटात ताडाच्या झाडावर वीज कोसळून आग लागली. पेट्रोल पंपाजवळ घडलेल्या या घटनेमुळे काही काळ भीतीचं वातावरण होते.
Revdanda Lightning Incident
Revdanda Lightning IncidentPudhari
Published on
Updated on

Revdanda Lightning Incident: रायगड जिल्ह्यातील रेवदंडा परिसरात आज सकाळी अचानक हवामानाने रौद्ररूप धारण केले. मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा आणि सततच्या विजांच्या कडकडाटामुळे नागरिक आधीच घाबरलेले असताना एक धक्कादायक घटना घडली.

अलिबाग तालुक्यातील बगमळा परिसरात, पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस असलेल्या उंच ताडाच्या झाडावर अचानक वीज कोसळली. वीज पडताच झाडाने क्षणार्धात पेट घेतला. काही क्षणातच त्या झाडातून ठिणग्या उडू लागल्या.

Revdanda Lightning Incident
Who is John Ternus: ॲपल कंपनीचे नवे CEO जॉन टर्नस कोण आहेत? किती आहे संपत्ती? जाणून घ्या त्यांचा प्रवास

मुसळधार पाऊस सुरू असतानाही झाडाला लागलेली आग काही काळ धगधगत राहिली. हा थरारक प्रकार पाहण्यासाठी आसपासच्या नागरिकांनी गर्दी केली, मात्र परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे, ही घटना ज्या ठिकाणी घडली, त्याच्या अगदी जवळच CNG गॅस आणि पेट्रोल पंप असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.

Revdanda Lightning Incident
Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात पुढील काही तासांत हवामान बदलणार; मुंबई, रायगडसह कोकणात पावसाचा इशारा

या घटनेमुळे काही काळ परिसरात भीती पसरली. स्थानिकांनी घटनेच्या ठिकाणापासून सुरक्षित अंतर ठेवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाले नाही.

स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा सतर्क असून, नागरिकांना विजांच्या कडकडाटाच्या वेळी उघड्या जागेत न थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान खात्यानेही पुढील काही तासांत अशाच प्रकारचे वातावरण राहण्याची शक्यता वर्तवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news