Raigad ZP | रायगड जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतींच्या निवडी बिनविरोध

शिवसेनेचे चंद्रकांत कळंबे, शिवसेनेच्या रसिका केणी, भाजपचे वैकुंठ पाटील आणि राष्ट्रवादीचे नारायण डामसे यांची बिनविरोध निवड
Raigad ZP election
Raigad ZP electionpudhari photo
Published on
Updated on

Raigad Zilla Parishad Subject Committee Chairperson

अलिबाग : रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या १२ मार्च रोजी झालेल्या निवडीनंतर जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी येथील जिल्हा नियोजन सभागृहात पिठासीन अधिकारी सुनिल थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी ( दि.२३ ) एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शिवसेनेचे चंद्रकांत कळंबे, शिवसेनेच्या रसिका केणी, भाजपचे वैकुंठ पाटील आणि राष्ट्रवादीचे नारायण डामसे बिनविरोध निवड झाली.

शिवसेनेच्या रसिका केणी यांच्या वाट्याला महिला व बालविकास समितीचे पद वाट्याला आले असून, राष्ट्रवादीचे नारायण डामसे यांच्या वाट्याला समाजकल्याण समितीचे पद वाट्याला आले आहे. अन्य दोन सभापतींच्या खात्याचे वाटप होणे बाकी आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सकाळच्या वेळेत चारही विविध विषय समित्यांच्या सभापती पदासाठी शिवसेनेच्या वतीने चंद्रकांत कळंबे आणि शिवसेनेच्या रसिका केणी, भाजपच्या वतीने वैकुंठ पाटील आणि राष्ट्रवादीच्या वतीने नारायण डामसे यांनी आपले प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

Raigad ZP election
Raigad Gram Panchayat Election: रायगडात 127 ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीची रणधुमाळी; 30 सरपंच, 170 सदस्यांसाठी मतदान

दुपारी दोन वाजता जिल्हा नियोजन सभागृहात पिठासीन अधिकारी सुनिल थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली निवडीच्या कामकाजाला प्रत्यक्ष सुरवात होताच विविध विषय समित्यांच्या सभापती पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने पिठासीन अधिकारी सुनिल थोरवे यांनी या चौघांचीही निवड बिनविरोध करीत असल्याचे जाहीर करीत त्यांचे अभिनंदन केले. पिठासीन अधिकारी सुनिल थोरवे यांना निवडीच्या कामी रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंधर पठारे, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी रविंद्र शेळके, तहसीलदार डॉ. शितल रसाळ यांनी साह्य केले.

दरम्यान, या चारही सभापतींच्या निवडीनंतर रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील यांच्यासह सर्व उपस्थित जिल्हा परिषद सदस्य, तालुका पंचायत समिती सभापती, समर्थकांनी सभागृहात गर्दी करीत निवनिर्वाचित सभापतींचे अभिनंदन केले. निवडीच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घटनास्थळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news