Raigad ZP School | रायगड जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘आयडियल सेंटर डिजिटल लॅब’चे उद्घाटन

विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात, फुलांची उधळण आणि औक्षण करून स्वागत करण्यात आले.
Raigad Ideal Center Digital Lab
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अत्याधुनिक ‘आयडियल सेंटर डिजिटल लॅब’चे उद्घाटन करण्यात आले. Pudhari
Published on
Updated on

Raigad Ideal Center Digital Lab

पनवेल : उन्हाळी सुट्टीनंतर रायगड जिल्हा परिषद शाळांमध्ये सोमवारी (दि.१५) प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात, फुलांची उधळण आणि औक्षण करून स्वागत करण्यात आले.

पनवेल तालुक्यातील पीएमश्री शाळा वहाळ येथे झालेल्या मुख्य कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांच्या हस्ते अत्याधुनिक ‘आयडियल सेंटर डिजिटल लॅब’चे उद्घाटन करण्यात आले. या डिजिटल लॅबमुळे विद्यार्थ्यांना दृकश्राव्य माध्यमातून आधुनिक शिक्षण मिळणार असून, शिक्षकांचे अध्यापन अधिक प्रभावी होणार आहे. तसेच ऑनलाइन परीक्षांच्या सुविधेमुळे विद्यार्थ्यांच्या डिजिटल कौशल्यांचा विकास होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Raigad Ideal Center Digital Lab
Raigad Fort Restoration: रायगडावर बसविल्या शिवकालीन १८ पायऱ्या

मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे कौतुक केले. जिल्हा परिषद शाळांमधील गुणवत्तापूर्ण बदलांमुळे पालकांचा सरकारी शाळांवरील विश्वास वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. मूल्याधारित शिक्षण, संवैधानिक मूल्ये, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारी यांवरही त्यांनी भर दिला.

या कार्यक्रमास विविध लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, जिल्ह्यातील इतर शाळांनाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. प्रवेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके व गणवेशांचेही वितरण करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news