रायगड : पुराच्या पाण्यातून चालत येताना तरूणाचा व्हिडिओ व्हायरल!

सांदोशी येथील घटना; प्रशासनाची डोकेदुखी वाढली
Raigad flood water Video viral
तरूणाचा पुराच्या पाण्यातून चालत येणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.Pudhari News Network

नाते : सांदोशी परिसरात नदीच्या पात्रामध्ये पुराचे पाणी जात असताना एका तरुणाचा त्यामधून येण्याचा व्हिडिओ आज (दि.९) व्हायरल झाला आहे. अशा अतिरेकी साहसपणाला नागरिकांकडून बगल द्यावी व असे प्रकार करू नयेत, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वीच किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या रायगडवाडी येथील ४० वर्षीय मनोज खोपकर हा इसम पाण्यामध्ये वाहून गेल्याची दुर्घटना ताजी असतानाच या तरूणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. हा तरूण आदिवासी भागातील असून त्यांचे नाव समजू शकले नाही.

Raigad flood water Video viral
मोशी : इंद्रायणी नदीची पाणीपातळी वाढली

मात्र सांदोशी गावाच्या परिसरातील असलेल्या छोट्या पुलावरून हा आदिवासी तरुण येत असल्याचे या व्हिडिओ मधून दिसून येतो. स्थानिक नागरिकांनी त्याला वारंवार येऊ नये, असे सांगत असताना देखील त्याने या भर नदीपात्रातील पुराच्या पाण्यामधून येण्याचे धाडस दाखवले. त्याचे हे धाडस आज जरी यशस्वी झाले असले, तरी यापासून नागरिकांनी बोध घेऊन असे धाडस करू नये, असे आवाहन पोलीस प्रशासन तसेच महाड स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news