मोशी : इंद्रायणी नदीची पाणीपातळी वाढली

मोशी : इंद्रायणी नदीची पाणीपातळी वाढली

मोशी : पुढारी वृत्तसेवा : परिसरात गेल्या चार दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. मावळातील आंध्रा धरण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने इंद्रायणी नदीची पाणीपातळी वाढली आहे.
यामुळे इंदोरी, निघोजे, देहू, खालुंब्रे, चिखली, मोशी, मोई, कुरुळी, चिंबळी, डुडुळगाव, आळंदी, चर्‍होली गावचे नदी काठ दुथडी भरून वाहत आहेत. नदीला पूर आल्याने जलपर्णीदेखील वाहून गेली असून, नदी पात्र मोकळे झाले आहे. यामुळे नदीचे स्वच्छ रूप पाहायला नागरिक गर्दी करत आहेत.

मोशी नजिकच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प उभे राहत असले तरी काही शेतकरी अजूनही आपली परंपरागत शेती करत आहेत. यात भुईमूग, मूग, तूर, बाजरी, कांदे, भात, उडीद यांसारखी पिके घेत आहेत. पावसाने दर्शन दिल्याने पिकाला जीवदान मिळाले आहे. अजून असाच मुसळदार पाऊस बरसावा अशी अपेक्षा येथील शेतकरी करीत आहेत.
डुडुळगाव भागात जलपर्णी वाहून आली आहे. पुढे आळंदी बंधार्‍यातदेखील जलपर्णीचा ढिगारा जमा झाला आहे. पाण्याच्या वाढता वेग पाहता येत्या काही दिवसांत संपूर्ण पात्रातील जलपर्णी वाहून जाण्याची चिन्हे आहेत. यामुळे लवकरच नदी मोकळा श्वास घेणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news