Raigad Ganesh Idol Business: गणपतीच्या मूर्तींनी महिलांना दिले आर्थिक बळ! रायगडमध्ये २४७ बचतगटांची १५.७४ कोटींची उलाढाल

रायगडमध्ये १ लाख ५७ हजार मूर्तींची विक्री
Raigad Ganesh Idol Business
Raigad Ganesh Idol BusinessPudhari
Published on: 
Updated on: 

रमेश कांबळे

अलिबाग: रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या पुढकारातून उमेद अभियानांतर्गत गणपती मूर्ती व्यवसायात महिलांनी पाऊल ठेवले आहे. या व्यवसायातून महिलांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे.

गणेशोत्सवात जिल्ह्यातील सुमारे २४७ बचतगटातील महिलांनी १ लाख ५७ हजार ६१२ गणपतीमूर्तींची विक्री केली आहे. यातून तब्बल १५ कोटी ७४ लाख ५९ हजार रुपयांची उलाढाल झाली आहे.

रायगड जिल्ह्यात नुकताच गणेशोत्सव उत्साहात पार पडला. रायगड जिल्ह्यातील पेण तालुका गणपती मूर्तींचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. पेणमध्ये तयार केलेल्या गणपती मूर्तींना देश, विदेशात मोठी मागणी आहे.

Raigad Ganesh Idol Business
Festival Season Inflation: जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्याने सर्वसामान्यांना महागाईचा फटका; गहू-तांदळाच्या दरांमध्ये पाच ते दहा रुपयांची वाढ

सुबक आखणी, नेटकी बैठक, सुंदर कोरीवकाम, रेखीव डोळ्यांची रचना आणि रंगकाम यामुळे पेणच्या गणपती मूर्तींना खास ओळख प्राप्त झाली असून, गणेशमूर्तीना भौगोलिक मानांकन मिळाले आहे. या व्यवसायात पेण तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यातील महिला बचतगटही उतरले आहेत.

या व्यवसायासाठी ‘उमेद’ अभियानामार्फत महिला बचतगटांना फिरता निधी तसेच ग्रामसंघांना समुदाय गुंतवणूक निधी आणि बँकांमार्फत पतपुरवठा करण्यात येतो. यामुळे महिलांच्या या व्यवसायाला गती प्राप्त झाली आहे.

यातून तब्बल १५ कोटी ७४ लाख ५९ हजार रुपयांची उलाढाल झाली आहे. त्या माध्यमातून उपजीविकेच्या नवनवीन संधी निर्माण होऊन महिला सक्षमीकरणाकडे वाटचाल करता येत आहे.

logo
Pudhari News
pudhari.news