Festival Season Inflation: जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्याने सर्वसामान्यांना महागाईचा फटका; गहू-तांदळाच्या दरांमध्ये पाच ते दहा रुपयांची वाढ

सणासुदीच्या तोंडावर गृहिणींचे अर्थकारण कोलमडले
Festival Season Inflation
Festival Season InflationPudhari
Published on: 
Updated on: 

महादेव सरसंबे

रोहे: सणासुदीच्या तोंडावर महागाई वाढली आहे. घरात लागणाऱ्या सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने गृहिणींचे अर्थकरण कोलमडले आहे. सर्वात जास्त महागाईचा फटका मध्यमवर्गीयांना बसत असल्याचे दिसून येत आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

बाजारात तांदूळ, गहू यासह कडधान्याचे किमतीत किमान १० ते १५ रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्व सामान्य कुटुंबीयांना व मध्यमवर्गीयांना आपल्या व्यवसाय, पगारात कुटुंब चालवणे जिकरीचे होत आहे.

Festival Season Inflation
Reliance Home Finance CBI Case: रिलायन्स होम फायनान्स प्रकरणात मोठी कारवाई! सीबीआयचे दुसरे आरोपपत्र; ७,४२९ कोटींच्या निधीचा दावा

गणेशोत्सव संपला असून आता नवरात्र उत्सव, दसरा, दीपावली हे येणारे पुढचे सण, उत्सव असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात बाजारात खरेदी होऊ शकते. सध्या वाढलेल्या महागाईमुळे व जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांसह मध्यमवर्गीय नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे.

अत्यावश्यक खरेदी असल्याने गृहिणीच्या स्वयंपाक घरातील वस्तूची वाढत्या महागाईमुळे आटोक्यात साहित्य खरेदी करताना गृहिणी दिसत आहे. अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत मागील काही दिवसांत ५ ते १० रुपयांची वाढ झाल्याने घरखर्चाचा ताळमेळ साधताना कुटुंब प्रमुखाची विशेषता मध्यमवर्गीय नोकरदारांची व छोटया व्यवसायीकांची दमछाक होत आहे.

Festival Season Inflation
Kandivali Fraud Case: खजिना, चमत्कारी चष्मा अन् पैशांचा पाऊस! कांदिवलीत वृद्धाची ३१ लाखांची फसवणूक

बाजारात सातत्याने तांदूळ, गहू, डाळी कडधान्य यासह अन्य किराणा वस्तूंच्या दरात चढ-उतार सुरू आहेच. परंतु मागील काही दिवसांपासून किमतीत उतार कमी पण चढ जास्त दिसत आहे.

पगार अथवा व्यवसायाच्या महिन्याच्या उत्पन्नातून घरभाडे, शिक्षण, आरोग्य, आणि इतर खर्च भागविल्यानंतर हातात उरणाऱ्या रकमेतून घर चालवताना कुटुंब प्रमुखांचे नाकी नऊ येताना दिसत आहे. वाढत्या महागाईमुळे नागरिकांना आवश्यक वस्तूंची खरेदी करतानाही अनेकदा काटकसर करावी लागत आहे.

सध्या विविध प्रकारचे तांदूळ बाजारात आहेत. पूर्वी तांदूळ ५० रुपयांपासून पुढे भेटत होते. आता या तांदळावर किलोमागे तांदुळ १५ रु ते २० रु. वाढले आहे. त्यामुळे आता तांदूळ किमान एक किलो ६० रु. रुपयाच्या पुढे भेटत आहे. मध्यमवर्गीय खरेदी करत असलेला चांगला तांदूळ ७० रु. ते ८० रुपये किलोने मिळत आहे. ४० रु. किलोचा गहु सध्या एक किलो गहु ४२ रु.चा ४७ रु पुढे मिळत आहे. गहु ५ रु. किलो मागे वाढल्याचे दिसून येते. तुरडाळ किलो १३० रुपयांचे आता १५० रु ते १६० रु रूपये मिळत आहे.

गणपती पुर्वी ४६ रु. ते ४८ रु. किलो असलेली साखर आता ५५ रु. पुढे भेटत आहे. मध्यंतरी साखर ७० रु.पर्यंत गेली होती. नामवंत कंपनीचे दळलेले गव्हाचे पीठ ५ रु. वाढले. चणाडाळ एक किलो ९० रु., १०० रु.ला भेटणारे चणाडाळ आता १०० रु., ११० रु .झाले आहे. खाद्यतेल लिटर मागे आता १० रुपये वाढले आहेत. रवा, मैदा बेसन ५ रुपयापासून ते २० रुपयेपर्यंत किलोमागे वाढ झाली आहे. साखरेबरोबर गुळ ही महागले आहे.

किलो मागे दहा रुपये महाग झाले आहे. गरजेच्या वस्तुमध्ये साबुदाणा, शेंगदाणा, मुगडाळ, उडीदडाळ, पोहे आदीचे किमती वाढल्या आहेत. यासह दिवाळीसाठी लागणाऱ्या वेलची, चारोळ्या, खसखस, मणुका, काजु बदामाच्या किमतीत सुद्धा वाढ झाली आहे.

महागाईमुळे सामान्य माणसाचे हाल होत आहेत. ग्राहकांना वाटत आहे की दुकानदार किमती वाढवत आहे. परंतु होलसेलचे दर वाढल्याने किराणा सामान महाग मिळत आहे. त्यामुळे दुकानदारांना नाईलाजास्तव भाव वाढवावे लागत आहे.

- विलास गुजर, अध्यक्ष, किराणा व्यापारी असोसिएशन, रोहा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news