Raigad Robbery | वृद्ध महिलेला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या पाच दरोडेखोरांना अटक; ८.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त

उलवा पोलिसांकडून बदलापूर येथून दरोडेखोरांना घेतले ताब्यात
Uran Gavhangaon Robbery
दरोडेखोरांच्या टोळीचा उलवा पोलिसांनी पर्दाफाश करत ८ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला Pudhari
Published on
Updated on

Uran Gavhangaon Robbery

उरण : गव्हाणगाव येथे घरात एकट्या असलेल्या ५३ वर्षीय महिलेला चाकूचा धाक दाखवून तब्बल ९ लाख रुपयांचा ऐवज लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीचा उलवा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गुन्हे प्रकटीकरण पथकाने अवघ्या काही तासांत तपासाची चक्रे फिरवत पाच आरोपींना अटक केली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली वाहने, मोबाईल फोन आणि रोख रकमेसह एकूण ८ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गव्हाणगाव येथे राहणाऱ्या  शेवंती धाया कोळी या घरात एकट्या असल्याची संधी साधून आरोपींनी १८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री त्यांच्या घरावर दरोडा टाकला. आरोपींनी घराचे कौल काढून छतातून घरात प्रवेश केला. त्यानंतर शेवंती कोळी यांच्या गळ्याला चाकू लावून जीवे मारण्याची धमकी देत घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटली.

Uran Gavhangaon Robbery
Raigad Bribery Case: ४० लाखांची लाच घेताना तिघांना अटक; अतिरिक्त आयुक्तांसह जीएसटी अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात

दरोडेखोरांनी सुमारे ७ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि २ लाख रुपये रोख, असा एकूण ९ लाख रुपयांचा ऐवज घेऊन घटनास्थळावरून पलायन केले.

घटनेची माहिती मिळताच उलवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तातडीने तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान पोलिसांचे पथक बदलापूर येथे पोहोचले. तेथे रोहित शांताराम मालुसरे आणि सुरज राजू गायकवाड या दोघांना गुन्ह्यात वापरलेल्या कारसह ताब्यात घेण्यात आले.

या दोघांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी गव्हाणगाव येथील स्थानिक आरोपी दीपेश सुरेश भोईर, प्रवीण सदानंद कोळी आणि फरहान अल्ताफ शेख यांना अटक केली.

रोहित मालुसरेविरुद्ध १७ गुन्हे

अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी रोहित मालुसरे याच्याविरुद्ध एमएमआर परिसरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरी, घरफोडी आणि हत्यार बाळगल्याप्रकरणी तब्बल १७ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर सुरज गायकवाड याच्याविरुद्ध भोसरी येथे घरफोडीचा, तर अहिल्यानगर येथे खुनाचा गुन्हा नोंद असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Uran Gavhangaon Robbery
Raigad Ganeshotsav 2026: गणेशोत्सवासाठी रायगड प्रशासन सज्ज! शांतता कमिटीच्या बैठकीत पालकमंत्र्यांच्या महत्त्वाच्या सूचना

८ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली तसेच त्यांच्या ताब्यातील वाहने आणि इतर साहित्य जप्त केले आहे. त्यामध्ये—

  • ४ लाख रुपये किमतीची होंडा जॅझ कार

  • २ लाख रुपये किमतीची केटीएम दुचाकी

  • ७५ हजार रुपये किमतीची ॲक्सेस स्कूटी

  • १ लाख ४५ हजार रुपये किमतीचे आयफोन १६ व अन्य चार मोबाईल

  • ४५ हजार रुपये रोख

    असा एकूण ८ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त अमित काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय चौधरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाने आणि पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सपोनि सुरेश खराततुषार बच्छाव, एएसआय दिगंबर झांजे, हवालदार अजिंक्य गोसावीरोहन तांडेल,  नाईकवाडे,  कोठुळेरावळठाकूरघुगे आणि माळशिकारे यांच्या पथकाने केली.

दरम्यान, या गुन्ह्यातील आणखी चार फरार आरोपींचा शोध घेण्याचे तसेच लुटीतील उर्वरित मुद्देमाल हस्तगत करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

logo
Pudhari News
pudhari.news