रायगड: पनवेलमध्ये रॅलीत झालेल्या हल्ल्यात दोन युवक गंभीर जखमी

रायगड: पनवेलमध्ये रॅलीत झालेल्या हल्ल्यात दोन युवक गंभीर जखमी
Published on
Updated on

पनवेल : पुढारी वृत्तसेवा : पनवेल येथे रॅली दरम्यान झालेल्या हल्ल्यात दोन युवक गंभीर जखमी झाले. चिन्मय सलोनी (वय २६) आणि संदीप ठाकूर (वय २५, रा. पनवेल) असे जखमी झालेल्या युवकांची नावे आहेत. एकाच्या डोक्यावर वार झाले आहेत, तर दुसऱ्याच्या पाटीवर वार झाले आहेत. या दोघांवर पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून नवी मुंबईतील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना आज (दि.२२) दुपारी घडली. यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर आणि शेकाप नेते प्रीतम म्हात्रे  यांच्यासह  ५० ते ६० कार्यकर्त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत हल्ला करण्यावर कडक कारवाई करून हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी केली. पनवेल शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news