Thakari Chilli: सेंद्रीय गावरान 'ठाकरी मिरची'ला मोठी मागणी

सुधागडातील आदिवासी बांधव पारंपरिक पद्धतीने पिकवतात वैशिष्ट्यपूर्ण मिरची
Thakari Chilli
Thakari ChilliPudhari
Published on: 
Updated on: 

संतोष उतेकर

सुधागड: वातावरणातील बदल आणि पावसाची कमतरता यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटल्याने पुणे व नवी मुंबईतून येणाऱ्या भाजीपाल्याच्या दरांमध्ये मोठी घसरण आणि चढउतार पाहायला मिळत आहे.

मात्र, या महागड्या भाजीपाल्याला सुधागड तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी पिकवलेल्या सेंद्रिय गावरान भाज्यांचा एक स्वस्त, पौष्टिक आणि आरोग्यदायी पर्याय उपलब्ध झाला आहे. पारंपारिक पद्धतीने पिकवलेली ‘ठाकरी मिरची'ला मोठी मागणी आहे.

Thakari Chilli
Maharashtra UK Investment Partnership: महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी उत्तम वातावरण; फडणवीस यांचे यूकेच्या उद्योजकांना आवाहन

आदिवासी बांधव व स्थानिक शेतकरी डोंगर-उतारावर, रानमाळावर आणि घराच्या परसात कोणत्याही रासायनिक खतांचा किंवा किटकनाशकांचा वापर न करता या भाज्या पिकवतात. आणि आदिवासी महिला बाजारात विक्रीसाठी घेऊन येतात.

बाजारात सध्या शिराळे, घोसाळे, कारली, माठ, वांगी, भेंडी, काकडी, दुधी, गवार आणि ठाकरी मिरची मुबलक प्रमाणात दाखल झाली आहे. अवघ्या १५ ते २० रुपये जुडी, वाटा किंवा पाव किलो अशा परवडणाऱ्या दरात या भाज्या मिळत असल्याने ग्राहकांकडून मोठी मागणी होत आहे.

Thakari Chilli
Mumbai Orchestra Bar License Fee: ऑर्केस्ट्रा बारचालकांसाठी मोठा दिलासा! परवाना शुल्कवाढ १० टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर

‘ठाकरी मिरची’ची खास भुरळ

या सर्व गावरान भाज्यांमध्ये आदिवासी बांधवांनी पारंपारिक पद्धतीने पिकवलेली ‘ठाकरी मिरची’ (ज्याला बुटकी किंवा ठेंगू मिरचीही म्हणतात.) विशेष आकर्षण ठरत आहे.अतिशय तिखट आणि चविष्ट असलेली ही ठाकरी मिरची तेलात तळून, हळद-मीठ लावून वाळवून किंवा तिचे लोणचे करून खाल्ली जाते. या मिरचीचा ठेचा अथवा चटणी जेवणाची चव वाढवणारी ठरते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news