Andhericha Raja Ganpati: 'अंधेरीचा राजा' च्या देखाव्यात श्री राम मंदिराची झलक

Andhericha Raja Ganpati: 'अंधेरीचा राजा' च्या देखाव्यात श्री राम मंदिराची झलक
Published on
Updated on

मुंबई: अंधेरीचा राजाला 'नवसाचा राजा' म्हणूनही ओळखले जाते. अंधेरीच्या राजाची मूर्ती ९ फूट उंच असते. हे मंडळ दरवर्षी भारतातील प्रसिद्ध मंदिर किंवा ऐतिहासिक वास्तुकलेची हुबेहूब प्रतिकृती म्हणून आपला मंडप तयार करण्यासाठी ओळखले जाते. ही मूर्ती अधिकृत ट्रेडमार्क नोंदणीकृत आहे. यावेळी देखाव्यात अयोध्येतील भव्य श्री राम मंदिराची झलक पाहायला मिळत आहे.

श्रीराम मंदिराच्या स्थापत्यकलेप्रमाणे आणि भव्यतेप्रमाणे गणेश मंडपाची सजावट करण्यात आली आहे. मंदिराचे खांब, शिखर, मंडप आणि कोरीव सजावट यामुळे भाविकांना अयोध्येतील राम मंदिराचा अनुभव येतो. २०२६ मधील 'अंधेरीचा राजा'ची ही विशेष संकल्पना भक्तांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

Andhericha Raja Ganpati: 'अंधेरीचा राजा' च्या देखाव्यात श्री राम मंदिराची झलक
London Gift Scam: मॅट्रिमोनियल साइटवर महिला पोलीस शिपायाशी मैत्री; लंडनहून गिफ्टचे आमिष अन् ११.१९ लाखांची फसवणूक

मंडळाच्या ६१ व्या वर्षानिमित्त साकारण्यात आला आहे. राम मंदिराच्या देखाव्याची संकल्पना सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक धर्मेश शाह यांची आहे. देखाव्याच्या निर्मितीबद्दल माहिती देताना ते म्हणाले की, यंदा गणेशोत्सव दरम्यान अयोध्यामधील सुप्रसिद्ध श्रीराम मंदिराची प्रतिकृती तयार करण्याची चर्चा झाली.

हा देखावा उभारण्यासाठी मंडळाची एक विशेष टीम अयोध्येला गेली होती. तेथील राम मंदिराची रचना आणि आर्किटेक्चरचा सखोल अभ्यास करून अथक परिश्रमानंतर हा भव्य देखावा डिझाइन करण्यात आला आहे आणि त्यानंतर देखाव्याच्या निर्मितीसाठी तयारी सुरू केली.

Andhericha Raja Ganpati: 'अंधेरीचा राजा' च्या देखाव्यात श्री राम मंदिराची झलक
Nair Hospital Doctors Suspended: नायर’मध्ये दोन डॉक्टरांसह परिचारिका निलंबित; चिमुकल्याच्या मृत्यूनंतर कारवाई

हा सुंदर व भव्य आराखडा तयार करण्यासाठी तीन महिन्यांचा काळ लागला. देखाव्याच्या रचनेतील प्रत्येक खांबाची डिझाईन वेगळी आहे. संपूर्ण पंडलात आकर्षक झुंबर लावून सुंदर सजावट केली आहे. देखावा आणि मुख्य मंडपाबाहेर भगवान श्रीरामांची सुंदर मूर्ती देखील उभारण्यात आली आहे.

समितीचे अध्यक्ष अशोक राणे यांनी सांगितले, मंडळ दरवर्षी सर्व सरकारी नियमांचे पालन करते, म्हणूनच अंधेरीच्या राजा उत्सव मंडळाला पहिल्या १० मध्ये स्थान मिळाले आहे. वेशभूषेपासून ते प्रसादाच्या वितरणापर्यंत प्रत्येक गोष्टीचे पालन केले जाते. या बाप्पाची विसर्जन मिरवणूक मुंबईतील सर्वात अधिक काळ चालणाऱ्या विसर्जन मार्गांपैकी एक आहे.

असा साकारला देखावा

अयोध्या मंदिराचा मंडप १४,००० चौरस फूट लाकडी चौथऱ्यावर बांधण्यात आला असून, त्याला १५ फूट उंच असलेल्या ४६ सुशोभित स्तंभांचा आधार आहे. यासाठी टनांहून अधिक फॅब्रिकेटेड स्टीलचा वापर करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news