

Kundalika river Amba river Flood Warning
रोहे : रोहा तालुक्यात सकाळपासून पावसाचा जोर कायम असून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. शहरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे तालुक्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. रोहा येथील कुंडलिका नदी व नागोठणे येथील अंबा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.
रोहा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाचे कमबॅक केले आहे. रोहा शहरासह ग्रामीण भागात पावसात जोर कायम आहे. विश्रांतीनंतर रोहा तालुक्यात पावसाने कमबॅक केले असून रात्रभर पाऊस पडला आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीला पावसाने हजेरी लावली आहे. शुक्रवारी रात्रभर पावसाने सातत्याने हजेरी लावल्याने संपूर्ण वातावरण पाऊसमय झाल्याचे दिसून येत आहे. शनिवारी सकाळपासूनच पाऊस रोहा तालुक्यात पडत आहे. रोहा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाचा जोर कायम आहे.
आज दहीहंडी उत्सव आहे. या उत्सवाला पावसाने हजेरी लावली. रात्री बारानंतर सर्वत्र दहीहंडी उत्सव चालू झाल्यानंतर पावसाने सुरूवात केली आहे. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला होता.