Raigad Heavy Rain | रोह्यात मुसळधार पाऊस; कुंडलिका, अंबा नद्यांनी ओलांडली इशारा पातळी

यगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी, नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा
Roha Flood Alert
सलग चार ते पाच दिवस सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेPudhari
Published on
Updated on

Roha Flood Alert

रोहा : हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केल्यानंतर रोहा तालुक्यात मुसळधार पावसाने जोर धरला आहे. सलग चार ते पाच दिवस सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील नदी-नाले तुडुंब भरून वाहत असून कुंडलिका आणि नागोठणे येथील अंबा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

शनिवारी सकाळपासूनच पावसाचा जोर वाढल्याने रोहा शहरासह ग्रामीण भागात दिवसभर मुसळधार पाऊस कोसळला. डोंगरदऱ्यांतून मोठ्या प्रमाणात पाणी नदीपात्रात येत असल्याने तालुक्यातील अनेक लहान-मोठे ओढे आणि नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत.

Roha Flood Alert
Raigad Agriculture : पेणमधील दुबार पेरणीचे संकट टळणार?

रोहा तालुक्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या कुंडलिका नदीसह नागोठणे येथील अंबा नदीची पाणीपातळी इशारा पातळीच्या वर गेली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक नसल्यास नदीपात्र व पूरग्रस्त भागांमध्ये जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

रोहा शहरासह मेढा, यशवंतखार, चणेरा, घोसाळे, भालगाव, धाटाव, कोलाड, सुतारवाडी, खांब, देवकान्हे, धामणसई, एनघर, नागोठणे आणि आंबेघर परिसरातही जोरदार पावसाची नोंद झाली. सायंकाळपर्यंत पावसाची संततधार कायम होती, त्यामुळे जनजीवनावर त्याचा परिणाम होत असल्याचे चित्र दिसून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news