Ganpati Special Trains: गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेच्या २४६ गणपती विशेष गाड्या

अनारक्षित १८४ मिश्र विशेष गाड्या आणि ६२ अनारक्षित विशेष गाड्या चालवणार
Ganpati Special Trains
Ganpati Special TrainsPudhari Photo
Published on
Updated on

मुंबई: गणेशोत्सवासाठी मुंबईहून गावी जाणाऱ्या भाविकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेकडून २४६ गणपती विशेष गाड्या चालविल्या जाणार आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ९८ गाड्या, लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ७६ गाड्या, पुणे येथून १० गाड्या आणि अनारक्षित विशेष ६२ गाड्या चालविण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने सोमवारी दिली. त्यामुळे मुंबई आणि पुण्यावरून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

१) सीएसएमटी - सावंतवाडी रोड - दैनिक विशेष गाडी

ही गाडी ११ ते २६ सप्टेंबर या कालावधीत दररोज सीएसएमटी येथून १५.३० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे दुसऱ्या दिवशी ०४.०० वाजता पोहोचेल. तसेच हीच गाडी दररोज सावंतवाडी रोड येथून ०४.३५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी मुंबईत १६.४० वाजता पोहोचेल.

२) सीएसएमटी - सावंतवाडी रोड दैनिक विशेष गाडी

दररोज सीएसएमटी येथून ००.२५ वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी १४.२० वाजता पोहोचेल. सावंतवाडी रोड येथून १५.३५ वाजता सुटेल आणि मुंबईत ०४.३५ वाजता पोहोचेल.

Ganpati Special Trains
Palghar Collector Office: पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील उपाहारगृहावर एफडीएची कारवाई

३) सीएसएमटी - रत्नागिरी दैनिक विशेष गाडी

सीएसएमटी येथून ११.३० वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी २०.२५ वाजता पोहोचेल. तसेच रत्नागिरी येथून ०४.०० वाजता सुटेल आणि सीएसएमटीला त्याच दिवशी १३.३० वाजता पोहोचेल.

४) कुर्ला एलटीटी - सावंतवाडी रोड दैनिक विशेष गाडी

दररोज एलटीटी येथून ०८.२० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी २१.०० वाजता पोहोचेल. परत सावंतवाडी रोड येथून २२.३५ वाजता सुटेल आणि मुंबईत दुसऱ्या दिवशी ११.२५ वाजता पोहोचेल.

५) एलटीटी - सावंतवाडी रोड साप्ताहिक चालवण्यात येणारी विशेष गाडी

ही गाडी दर गुरुवारी आणि रविवारी एलटीटी येथून ०८.४५ वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी २२.१० वाजता पोहोचेल. सावंतवाडी रोड येथून २३.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११.४५ वाजता एलटीटी येथे पोहोचेल.

६) एलटीटी - सावंतवाडी रोड - एलटीटी साप्ताहिक विशेष गाडी

१५ आणि २२ सप्टेंबर दरम्यान दर मंगळवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ०८.४५ वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी २२.१० वाजता पोहोचेल. रात्री­ सावंतवाडी रोड येथून २३.२० वाजता सुटेल आणि एलटीटी येथे बुधवारी ११.४५ वाजता पोहोचेल.

Ganpati Special Trains
Mumbai Rainfall 2026: मुंबईत आतापर्यंत बरसला ७५ टक्के पाऊस

७) एलटीटी - रत्नागिरी - एलटीटी (आठवड्यातून ५ दिवस)

या विशेष गाड्या १२ ते २६ सप्टेंबर या कालावधीत दर मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी, शनिवारी आणि रविवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २१.०० वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ०५.०० वाजता पोहोचेल. तसेच दर बुधवारी, गुरुवारी, शुक्रवारी, रविवारी आणि सोमवारी रत्नागिरी येथून १५.१५ वाजता सुटेल आणि एलटीटी येथे दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ००.४० वाजता पोहोचेल.

८) एलटीटी - मडगाव - एलटीटी साप्ताहिक वातानुकूलित विशेष गाडी

दर मंगळवारी एलटीटी येथून मध्यरात्री ००.४५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी १४.३० वाजता पोहोचेल. दर मंगळवारी मडगाव येथून १६.३० वाजता सुटेल आणि एलटीटी येथे दुसऱ्या दिवशी ०७.१० वाजता पोहोचेल.

९) एलटीटी - मडगाव - एलटीटी साप्ताहिक विशेष गाडी

१६ आणि २३ सप्टेंबर दरम्यान दर बुधवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ००.४५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी १४.३० वाजता पोहोचेल. तर बुधवारी मडगाव येथून १६.३० वाजता सुटेल आणि एलटीटी येथे दुसऱ्या दिवशी ०७.१० वाजता पोहोचेल.

१०) पुणे - रत्नागिरी वातानुकूलित साप्ताहिक विशेष गाड्या

दर मंगळवार १५ आणि २२ सप्टेंबर दरम्यान पुणे येथून ००:२५ वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी ११:५० वाजता पोहोचेल. रत्नागिरी येथून १७:५० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०५:२० वाजता पोहोचेल.

११) पुणे - रत्नागिरी साप्ताहिक विशेष गाड्या

दर शनिवार पुणे येथून ००:२५ वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी ११:५० वाजता पोहोचेल. रत्नागिरी येथून १७:५० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०५:२० वाजता पोहोचेल.

१२) दिवा – खेड – दिवा मेमू दैनंदिन अनारक्षित विशेष गाड्या

दिवा येथून ०७.१५ वाजता सुटेल आणि खेड येथे त्याच दिवशी १४.३५ वाजता पोहोचेल. खेड येथून १६.०० वाजता सुटेल आणि दिवा येथे त्याच दिवशी २२.५० वाजता पोहोचेल.

१३) दिवा – चिपळूण – दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष गाड्या

दिवा येथून १३.४० वाजता सुटेल आणि चिपळूण येथे त्याच दिवशी २१.३० वाजता पोहोचेल. चिपळूण येथून ०७.३० वाजता सुटेल आणि दिवा येथे त्याच दिवशी १३.०० वाजता पोहोचेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news