Social Media Overuse Warning
नाते : विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील परिस्थिती कशीही असली, तरी परिस्थितीवर मात करुन शिक्षणावर भर दिला पाहिजे. शिक्षण घेत असताना प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिक्षणाशी आपली नाळ जुळवून घेतली पाहिजे, असे सांगत मोबाईलवर शिक्षणाच्या संदर्भात असणार्या माहिती सहजच मिळत आहेत, त्याचा उपयोग करून घ्या. मात्र, फेसबुक, इंस्टाग्राम यासारख्या अॅपचा वापर टाळण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या राऊत यांनी किंजळोली पार्टेकोंड येथे केले.
किंजळोली बु ( पार्टेकोंड) येथील शिवशंभू मित्र मंडळाच्या वतीने दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्याथ्यांचा गुणगौरव आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळेस मंडळाचे अध्यक्ष अनिकेत पार्टे, अनिल सकपाळ, जयवंत जाधव, मुख्यापक सुनिल पंदेरे, सुनिल चौधरी, संजय सुर्वे, एकनाथ पवार, माजी सरपंच अनिल पवार,माजी सदस्य निलेश पार्टे, गोपिनाथ कोंडाळकर, अमित शितोळे, विलास दाभेकर, महादेव पवार, राहूल पवार , सुरेश मळेकर , श्रीकांत पार्टे , संदेश दाभेकर ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, शिवशंभू मित्रमंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
प्रारंभी विद्या राऊत यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवपुतळ्ळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी लाडवली, मुळगांव, सोनार कोंड, दाभेकर कोंड, पारवाडी आणि मांडला येथील 10वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांचा ा हस्ते सन्मानचिन्ह, पुस्तक भेट देऊन, गुणगौरव करण्यात आला.