

Panchayat Samiti reservation
पोलादपूर : पंचायत समिती गणासाठी सोमवारी (दि.१३) कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहात रव्रिंद्र राठोड निरीक्षक तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) व तहसीलदार कपिल घोरपडे पोलादपूर यांच्या उपस्थितीत आरक्षण जाहीर करण्यात आले.
११५ माटवण नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), लोहारे ११७ सर्वसाधारण महिला, कापडे सर्वसाधारण, कोतवाल सर्वसाधारण या प्रकारे सोडत काढण्यात आली. पोलादपूर तालुका पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीची तयारी प्रशासनाच्या पातळीवर पूर्ण वेगाने सुरू झाली आहे. पंचायत समितीच्या चार गणांचे आरक्षण सोडतीद्वारे काढण्यात आले
मागील निवडणुकीत पोलादपूर पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीवेळी गोवेले 115 पं. स. गणातून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून शेकापच्या नंदा दिनकर चांदे, देवळे 116 पं.स.गणातून सर्वसाधारण प्रवर्गातून काँग्रेसचे शैलेश सलागरे, लोहारे 117 पं. स. गणातून नागरिकांचा मागास प्रवर्गातून शिवसेनेचे यशवंत कासार तर कोंढवी 118 पं.स.गणातून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून काँग्रेसच्या दिपिका दरेकर या निवडून आल्या.
या निवडणुकीमध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शेकापक्षाची निवडणूक पूर्व आघाडी होती. परिणामी, या आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले. मात्र, त्यावेळी पंचायत समिती सदस्यांच्या निवडणुकीनंतर सभापतीपदाचे आरक्षण अनुसुचित जाती महिला पडल्याने काही काळ काँग्रेसचे शैलेश सलागरे हे सदस्य प्रभारी सभापतीपदी विराजमान झाले. हे अनुसुचित जाती प्रवर्गाचे आरक्षण निवडणुकीपुर्वी जाहिर झाले नसल्याने उमेदवारांअभावी यानंतर हे आरक्षण बदलण्यात येऊन सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी सभापतीपदाचे आरक्षण जाहीर झाले. यामुळे सभापतीपदी काँग्रेसच्या दिपिका दरेकर यांना संधी मिळाली आणि प्रभारी सभापती शैलेश सलागरे यांना उपसभापती पदाची संधी मिळाली.
मात्र, मागील कार्यकाळ संपल्या नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या.होत्या मात्र नव्याने आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुकांच्या अपेक्षा पुन्हा वाढल्या असल्याने मोर्चे बांधणीला सुरवात होणार आहे तालुक्यातील शिंदे गट शिवसेना विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गट सह शेकाप व भाजप ची रणनीती तालुक्यातील समीकरणे बदलणारी ठरणारी आहेत.
रायगड जिल्हा परिषद सदस्य तसेच पोलादपूर पंचायत समिती सदस्यपदाच्या निवडणुकीपूर्वी सभापती पदाच्या तसेच रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणांची घोषणा झाल्याने मागील वेळीसारखा घोळ होणार नाही, हे निश्चित असून आजच्या पोलादपूर येथील पंचायत समितीच्या गणांच्या आणि अलिबाग येथील गटांच्या आरक्षण सोडतीनंतरच पोलादपूर तालुक्यातील राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी वेगवान होणार आहे.