

पोलादपूर (रायगड) : पोलादपूर-महाबळेश्वर-वाई-सुरुर राज्य मार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू असून अनेक ठिकाणी डोंगर पोखरण्यात आल्याने डोंगर वरची माती व झाडे खाली आल्याने मुळात अरुंद असलेला रस्ता एकेरी वाहन जाईल इतका प्रवासासाठी मिळत आहे, त्यातच अवजड मशनरी काम करत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. सद्य स्थितीत ठेकदार कडून कोणतेही पूर्व सूचना न देता कापडे गावातील शेतकरी वर्गाच्या रहिवाशी याच्या जागेवर जेसीबी लावण्याचा प्रयत्न काही नागरिकांनी हाणून पडला असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.
जून ते ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसात अनेकदा दरड कोसळली असल्याने ती बाजूला करत असताना मोठी माती किंवा दगड कोसळण्याची शक्यता लक्षात घेता उपाययोजना सदरचा रस्ता जिल्हाधिकारी रायगडसह सातारा जिल्ह्याला पोलादपूर तहसील कार्यलयामार्फत सदरचा रस्ता एक महिना बंद ठेवण्यात आला होता. गणपती उत्सवादरम्यान सर्वच प्रकारची वाहतूक सुरू करण्यात आली असली, तरी मोठी वाहने एकाच वेळेला दोन्ही बाजूनी आली असता, वाहनचालकांना तारेवरची कसरत करत वाहने मागे घ्यावी लागत आहेत. पोलादपूर महाबळेश्वर रस्त्याचे सुधारणेचे काम कंत्राटदार आरपीपीएस आयपएल (खत) यांचेमार्फत हाती घेण्यात आले असून सद्यस्थितीत काम प्रगतीपथावर आहे. सदर रस्ता पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटातून जात असून पायटा गावापासुन महाबळेश्वरकडे जाताना १ कि. मी अंतरावर दरडप्रवण क्षेत्र आहे. डोंगरावरील दगड गोठे व माती जेसीबीच्या सहायाने काढण्याचे काम कंत्राटदार) याचे मार्फत चालू आहे. तसेच काही ठिकाणी मातीचे ढिगारे जैसे थे असल्याचे प्रवास दरम्यान दिसुन आले. सदरची माती व दगड रस्त्यावर असल्याने या ठिकाणी एकेरी मार्गिका वाहतुकीसाठी उरत असल्याने वाहनचालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे.
सद्य स्थितीत यामार्गवरून अक्कलकोट, तुळजापूर कोल्हापूर मिरज सह महाबळेश्वर महाड मुंबई, वाई महाड मुंबई, पाचगणी महाड मुंबई, सह नालासोपारासह वसई पालघर आगराच्या बसेस महाबळेश्वर तालुक्यातील गावात ये-जा करत आहेत. या मार्गाचे काम सुरू असले तरी कापडे गावातील अनेक जणांच्या जमिनी या रुंदीकरण मध्ये जात असल्याने कोणतेही कल्पना अथवा नोटीस न देता अचानक जेसीबीच्याद्वारे खोद काम करण्यात येत आहे. याची खबर लागताच जागा मालक यांनी जागेवर जात सदरचे काम ठप्प पाडले आहे.
बाधित शेतकरी
जर पूर्वी वाड वडील यांच्या काळात जर ही शेतजमीन हायर करण्यात आली असेल तर (सातबारा) उतारा वरती त्याची नमुदीकरण आल पाहिजे होत. ते कोणत्याही शेतकऱ्याच्या सातबारा वरती अधिग्रहण मोजमाप असा कोणताही उल्लेख नाही. त्याचप्रमाणे नवीन खरेदी खत शासन विक्रीला स्टॅम्प ड्युटी सरसकट विक्री केली जात मग अशा प्रकारे शेतकऱ्याची फसवणूकच केली जात आहे. शासनाने अधिग्रहण केलेली जागा सातबारामध्ये उल्लेख का नाही अशी विचारणा बाधित शेतकरी करत आहेत त्याच प्रमाणे जो पर्यंत शासन शेतकऱ्यांना अधिग्रहण केलेल्या जागेचा दाखला देत नाही त्याच तो पर्यन्त हे काम बंद रहावे अशी मागणी करण्यात आली आहे.
कापडे बुद्रुक रोड लगत असणाऱ्या शेतजमीन सरसकट वीस ते पंचवीस फूट रोड रुंदीकरण मध्ये जात आहे. रस्ते ठेकदार यांच्याजवळ चर्चा केल्या नंतर त्यांचे अभियंता यांनी दिलेल्या महीती. नुसार १९८०/९० च्या दरम्यान शेतजमीन अधिग्रहण केली असल्याचे सांगण्यात आले.