Pen Crime : पेणमध्ये नसरापूरची पुनरावृत्ती? पाच वर्षांच्या मुलीची हत्या, संशयिताला अटक

संशयित आरोपीला बुधवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार
Pen Minor Girl Assaulted Case
Pen Minor Girl Assaulted CasePudhari
Published on
Updated on

Pen Minor Girl Assaulted Case

पेण : पेण तालुक्यात पाच वर्षाच्या मुलीच्या हत्येची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली. अत्याचारानंतर पीडितेची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज असून शवविच्छेदन अहवालातून अत्याचार केला की नाही हे स्पष्ट होईल. दुसरीकडे पोलिसांनी 24 वर्षांच्या संशयित आरोपीला अटक केली असून त्याला बुधवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

पेण तालुक्यातील आदिवासीवाडीत राहणारी पाच वर्षांची मुलगी घरासमोर झोपली होती. मुलगी दिसत नसल्याने तिच्या आईवडिलांनी शोधाशोधही केली. शेवटी मुलगी बेपत्ता झाल्याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांच्या पथकाने परिसरात शोधमोहीम हाती घेतली. मंगळवारी सकाळी श्वानपथकही घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक अंचल दलाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक फडतरे, पेण पोलीस निरीक्षक जाधव व इतर कर्मचाऱ्यांनी श्वान पथकासहित शोध घेतला असता आरोपीचा शोध लागला.

Pen Minor Girl Assaulted Case
Pen Rain Damage Salt Farms: पेणमधील दीडशे एकर मिठाची शेती उद्ध्वस्त; मुसळधार पावसासह उधाणाच्या लाटांचा फटका

पोलिसांनी संशयित आरोपी किरण वाघमारे याला अटक केली आहे. तर पीडित मुलीचा मृतदेह तिच्या घरापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या निर्जनस्थळी सापडला. पीडित मुलीच्या मृतदेहावर कपडे नव्हते तसेच जखमाही होत्या. यावरुन नराधम किरणने तिच्यावर अत्याचार केला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. पीडित मुलीचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पेणमधील रुग्णालयात पाठवण्यात आले असून शवविच्छेदन अहवालातून अत्याचाराबाबतची माहिती समोर येईल.

पेण तालुक्यात गेल्या सहा महिन्यातील अत्याचार आणि खुनाची ही दुसरी घटना आहे. पेण पासून सात किलोमीटर अंतरावर शितोळे वाडीच्या हद्दीत एका महिलेवर अत्याचार करून खून करण्यात आला होता. त्यातील दोन परप्रांतीय आरोपीना पेण पोलिसानी अटक केली होती. नसरापूर प्रकरणी कोर्टाने अवघ्या साठ दिवसांत निकाल दिला असतानाच आता पेण तालुक्यातही अशीच घटना घडल्याने संताप व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news