Panvel Crime | फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी स्वीकारली 50 हजारांची लाच, पनवेलमध्ये PSI ला अटक

नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
 Panvel PSI arrested
सचिन वायकर(Pudhari Photo)
Published on
Updated on

Panvel ACB Trap PSI arrested

पनवेल: पनवेल शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सचिन वामनराव वायकर (वय ४२, पनवेल, जि. नवी मुंबई) आणि त्याचा खासगी साथीदार रवींद्र उर्फ सचिन सुभाष बुट्टे (वय ३०, रा. करंजडे, सेक्टर १, पनवेल) यांना रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार (वय ३२) यांच्या वडिलांविरुद्ध पनवेल शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्यातील तपास अधिकारी म्हणून सचिन वायकर कार्यरत होते. तक्रारदारांना धमकी देत वायकर यांनी गुन्ह्यात आणखी कलमे वाढवून अंतरिम जामीन नामंजूर करून वडिलांना अटक करण्याची भीती दाखवली. ही अटक टाळायची असेल तर १ लाख रुपयांची लाच देण्याची मागणी त्यांनी केली, अशी तक्रार २१ जुलै २०२५ रोजी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल झाली.

 Panvel PSI arrested
Panvel Railway Station Drugs Seized: पनवेल रेल्वे स्थानकावरून तब्बल 35 कोटींचे ड्रग्ज जप्त, दोन जण ताब्यात

तक्रार पडताळणीदरम्यान वायकर यांनी लाच घेण्याची मागणी कायम ठेवली. त्यानंतर विभागाने पनवेलमध्ये सापळा रचला. २१ जुलै २०२५ रोजी रात्री साडेअकरा वाजता मारुती कुशन, शिवाजी चौक, जुना पनवेल येथे नियोजन करण्यात आले. तक्रारदाराकडून मागणीप्रमाणे ५० हजार रुपये स्वीकारताना वायकर यांना त्यांच्या कारमधून साथीदार रवींद्र उर्फ सचिन बुट्टे याच्यासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणात वायकर आणि त्याचा साथीदार या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news