Panvel Ganesh visarjan : पनवेल येथे भक्तीमय वातावरणात बाप्पांचे विसर्जन

Panvel Ganesh visarjan : पनवेल येथे भक्तीमय वातावरणात बाप्पांचे विसर्जन

पनवेल, पुढारी वृत्तसेवा : पनवेल महापालिका क्षेत्रातील कळंबोली, कोमोठे, पनवेल, खारघर या चारही प्रभागात सुमारे ६ हजारांहून अधिक घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींचे भक्तीमय वातावरणात, शांततेत विसर्जन  (Panvel Ganesh visarjan) करण्यात आले. यावर्षी महापालिकेने चारही प्रभागामध्ये एकूण 59 ठिकाणी नैसर्गिक विसर्जनाची सोय केली होती. यामध्ये पनवेलमध्ये 9 ठिकाणी, खारघरमध्ये 37 ठिकाणी, कळंबोली प्रभागामध्ये 9 ठिकाणी, कामोठेमध्ये 4 ठिकाणी गणेश विसर्जनाची सोय करण्यात आली होती. याचबरोबर विद्युत व्यवस्था, मंडप, बॅरिगेटिंग, गणेश मूर्तीची नोंदणी, लाऊड स्पीकर, लाईफ जॅकेट, विशेष तराफा निर्माल्य कलशाची सोय करण्यात आली होती.

यावर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती महापालिकेच्यावतीने प्रभाग समिती अ मध्ये 14 ठिकाणी, प्रभाग समिती ब मध्ये 5 ठिकाणी , प्रभाग क मध्ये 5 ठिकाणी , प्रभाग समिती ड मध्ये 2 ठिकाणी अशी 26 ठिकाणी कृत्रिम तलावाची सोय कण्यात आली होती. याचबरोबर महापालिका कार्यक्षेत्रातील 78 मोठ्या चौकांमध्ये मुर्तीदान व्यवस्था करण्यासाठी मोठा मंडप उभारून कर्मचाऱ्याची नियुक्ती केली होती. तसेच 300 पेक्षा जास्त फ्लॅट असणाऱ्या 36 सोसायट्यामध्ये तळमजल्यावरती मुर्तीदानासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. (Panvel Ganesh visarjan)

दरम्यान, विसर्जन सुरळीत पार पडण्यासाठी आयुक्त गणेश देशमुख तसेच अतिरिक्त आयुक्त भारत राठोड, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे, उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त वैभव विधाते, शहर अभियंता संजय जगताप, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, चारही प्रभाग अधिकारी यांनी पालिकेच्या सर्व विसर्जन ठिकाणांना भेटी देऊन व्यवस्थेची पाहणी केली.

अग्निशमन दल, वाहतूक विभाग, विद्युत विभाग, बांधकाम विभाग, घनकचरा व आरोग्य विभागातील स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, सफाई कर्मचारी, मुख्यालय कर्मचारी तसेच पोलिस विभागाच्यावतीने चोख बंदोबस्त करण्यात आला होता.

Panvel Ganesh visarjan : म्हसोबा तलाव येथे विद्युत ट्रॉली

म्हसोबा तलाव येथे बाप्पाच्या मोठ्या मूर्त्या विसर्जन करण्यासाठी विद्युत ट्रॉलीचे उद्घाटन शहर अभियंता संजय जगताप व कळंबोली शहर पोलीस निरीक्षक गुजर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता संजय कटेकर , अभियंता सुधीर साळुंखे, प्रभाग अधिकारी सदाशिव कवठे, अभियंता राहुल, विभाग प्रमुख प्रितम पाटील, विनायक जाने, आरोग्य निरीक्षक अरुण कांबळे, स्वच्छता निरीक्षक हरेश कांबळे, आदीसह कर्मचारी वर्ग, नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news