Savitri river pollution : नदी पात्रात कचरा, अखेर पोलादपूर नगरपंचायतीला नोटीस

‘सत्कार ग्रामीण फाउंडेशन रायगड (NGO) या संस्थेने गंभीर पर्यावरणीय प्रश्नाविरोधात NGT मध्ये याचिका दाखल केली होती.
Raigad News
Savitri river pollution : नदी पात्रात कचरा, अखेर पोलादपूर नगरपंचायतीला नोटीस file photo
Published on
Updated on

Raigad News: Waste in Riverbed — Poladpur Nagar Panchayat Finally Issued Notice

पोलादपूर : पुढारी वृत्तसेवा

पोलादपूर शहराचा कचरा सावित्री नदीपात्रात अनधिकृतपणे घनकचरा डम्पिंग केल्याप्रकरणी पोलादपूर नगरपंचायतीला नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल (NGT) कोर्टाने नोटीस बजावली आहे. रायगड जिल्ह्यातील ‘सत्कार ग्रामीण फाउंडेशन रायगड (NGO) या संस्थेने गंभीर पर्यावरणीय प्रश्नाविरोधात NGT मध्ये याचिका दाखल केली होती.

Raigad News
Poladpur Savitri River Pollution | सावित्री नदी प्रदूषणाविरोधात ‘आपली माती आपली माणसं’चे आंदोलन

सदर तक्रारीनुसार, पोलादपूर शहरातील संपूर्ण घनकचरा कोणतीही अधिकृत प्रक्रिया न करता थेट सावित्री नदीपात्रात टाकण्यात येत होता. त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होत असून पर्यावरणासह नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सत्कार ग्रामीण फाउंडेशनने या प्रकरणाची छायाचित्रे, स्थानिक नागरिकांच्या तक्रारी तसेच संबंधित कागदपत्रांसह राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतली होती. याची गंभीर दखल घेत NGT कोर्टाने पोलादपूर नगरपंचायत, तहसील कार्यालय पोलादपूर, प्रदूषण नियंत्रण मंडळ महाड यांना नोटीस बजावत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

Raigad News
Mahad River Desilting : सावित्री नदीमध्ये भोई घाटाजवळ लावले झेंडे!

सावित्री नदी ही रायगड जिल्ह्यातील महत्त्वाची नदी मानली जाते. अशा नदीपात्रात कचरा टाकण्याच्या प्रकारामुळे पर्यावरणप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणामुळे पोलादपूर नगरपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुढील सुनावणीकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news