Raigad News | रायगडात सर्पदंश, विंचवांचा डंख वाढला

जिल्ह्यात गेल्या अडीच महिन्यात 1633 दंश

snakebite
रायगडात सर्पदंश, विंचवांचा डंख वाढलाPudhari File Photo

रायगड ः रायगड जिल्ह्यातील कर्जतमधील आसलवाडी येथील एक शेतकरी महिला सर्पदंशाने नुकतीच दगावली. जिल्ह्यात सर्प, विंचूसह विविध विषारी दंशाने मृत्यूच्या घटना घडत आहेत. जिल्ह्यात सर्प, विंचू दंशाचे प्रमाण वाढतच आहे. यावर्षी मे, जून आणि 15 जुलैपर्यंतच्या अडीच महिन्यात रायगड जिलह्यात 1633 जणांना सर्प, विंचूसह विविध प्रकारचे दंश झाले आहेत. जिल्ह्यात महाड, माणगाव, अलिबाग, पेण तालुक्यांमध्ये सर्प, विंचू दंशाचे प्रमाण जास्त आहे. पावसाळ्यातील शेतीच्या कामांमुळे हा धोका आणखी वाढतो.

रायगड जिह्यात सर्प, विंचुसह विविध प्राणी चावल्याने प्राणी दंशाचे रुग्ण आढळून येतात. शेतीप्रधानता, बहुतांश जनसंख्या गावात वसलेली असल्याने गावांभोवती जंगल असल्याने प्राणी दंशाचे रुग्ण हे ग्रामीण भागात अधिक दिसून येतात. एका अभ्यासानुसार सर्पदंशाच्या 88 टक्के घटना ग्रामीण भागात होतात. यात बहुतेकजण शेतीवर काम करणारे सापडतात आणि 10 वर्षे ते 50 वर्षे वयाच्या व्यक्तींना, विशेषतः पुरुषांना बहुतेक सर्पदंश होतात असे आढळून आले आहे. सुमारे 80 टक्के सर्पदंश मे ते सप्टेंबर या पाच महिन्यांच्या काळात होतात.

समुद्री सर्प | पुढारी

रायगड जिल्हयात मे महिन्यात अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात सर्प, विंचू आणि अज्ञात दंशाचे एकूण 61 रुग्ण दाखल झाले होते. कर्जतरुग्णालयात 58, माणगाव रुग्णालयात 95, पनवेल रुग्णालयात 30, रोहा रुग्णालयात 58, पेण रुग्णालयात 37, श्रीवर्धन रुग्णालयात 19, महाड ग्रामीण रुग्णालयात 117, पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात 33, मुरुड ग्रामीण रुग्णालयात 7, चौक ग्रामीण रुग्णालयात 28, कशेळे ग्रामीण रुग्णालयात 7, जसवली ग्रामीण रुग्णालयात 1, म्हसळा ग्रामीण रुग्णालयात 25, खोपोली नगरपरिषद रुग्णालयात 16 आणि माथेरान नगरपरिषद विभागात 4 असे एकूण 606 जणांना सर्प, विंचू अथवा अन्य प्राण्यांचा दंश झाला आहे.

जून महिन्यात अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात सर्प, विंचू आणि अज्ञात दंशाचे एकूण 106 रुग्ण दाखल झाले. कर्जत उपजिल्हा रुग्णालयात 62, माणगाव उपजिल्हा रुग्णालयात 86, पनवेल उपजिल्हा रुग्णालयात 48, रोहा उपजिल्हा रुग्णालयात 81, पेण उपजिल्हा रुग्णालयात 74, श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात 27, महाड ग्रामीण रुग्णालयात 51, पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात 31, मुरुड ग्रामीण रुग्णालयात 15, चौक ग्रामीण रुग्णालयात 46, कशेळे ग्रामीण रुग्णालयात 26, जसवली ग्रामीण रुग्णालयात 1, म्हसळा ग्रामीण रुग्णालयात 20, खोपोली नगरपरिषद हद्दीत 23 आणि माथेरान नगरपरिषद विभागात 5 असे एकूण 722 जणांना सर्प, विंचू अथवा अन्य प्राण्यांचा दंश झाला आहे. जून महिन्यात विविध दंशाचे सव्वाशे रुग्ण वाढले आहेत.

1 जुलै ते 14 जुलै या दरम्यान अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात सर्प, विंचू आणि अज्ञात दंशाचे एकूण 73 रुग्ण दाखल झाले. कर्जत उपजिल्हा रुग्णालयात 26, माणगाव उपजिल्हा रुग्णालयात 27, पनवेल उपजिल्हा रुग्णालयात 14, रोहा उपजिल्हा रुग्णालयात 31, पेण उपजिल्हा रुग्णालयात 58, श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात 10, महाड ग्रामीण रुग्णालयात 21, पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात 5, मुरुड ग्रामीण रुग्णालयात 9, चौक ग्रामीण रुग्णालयात 5, कशेळे ग्रामीण रुग्णालयात 6, जसवली ग्रामीण रुग्णालयात 0, म्हसळा ग्रामीण रुग्णालयात 3, खोपोली नगरपरिषद हद्दीत 7 आणि माथेरान नगरपरिषद विभागात 0 असे एकूण 305 जणांना सर्प, विंचू अथवा अन्य प्राण्यांचा दंश झाला आहे.

प्रत्येक आरोग्य केंद्रांत लसीचा साठा

यंदाच्या पावसाळ्यात आरोग्य विभागामार्फत जिल्हा शासकीय रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर सर्पदंश प्रतिबंधक लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवण्यात आली आहे. सरासरी 15 ते 25 लसीचा प्रत्येक आरोग्य केंद्रात साठा करण्यात आला आहे. 15 तालुक्यांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरील लस उपलब्ध असून जिल्हास्तरावर अतिरिक्त लस सज्ज ठेवण्यात आली आहे. सर्पदंश झालेल्या रुग्णांसाठी एएमबीएचयु बॅग, लॅरिग्नोस्कोप ही साधने, एड्रेनालाईन, हाइड्रोकोर्ट, एट्रोपिन, नियोस्टिग्माइन ही इंजेक्शन जिल्हा रुग्णालयात उपलब्ध ठेवली आहेत.


snakebite
या बेटावर वेगवेगळ्या प्रजातींचे चार हजारांपेक्षाही अधिक सर्प

नागरिकांनी सर्पदंश झालेल्या व्यक्तीला धीर देऊन सर्वात अगोदर जवळच्या कोणत्याही सरकारी रुग्णालयापर्यंत आणावे. सर्पदंशाच्या बहुतांश घटना ग्रामीण भागात शेतामध्ये काम करत असताना घडतात. शेतकर्‍यांनी सर्वतोपरी काळजी घेऊनच शेतात जावे. पायात गम बूट असावेत, सर्पदंश हा अपघात असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सावध राहून काळजी घ्यावी.

किशन जावळे, जिल्हाधिकारी, रायगड

अडीच महिन्यातील दंशाच्या घटना

मे : सर्प - 156, विंचू- 362, इतर दंश- 88, एकूण- 606

जून : सर्प - 310, विंचू- 280, इतर दंश- 132, एकूण- 722

जुलै : सर्प - 173, विंचू- 65, इतर दंश- 67, एकूण- 305

(1 जुलै ते 14 जुलै)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news